(दि.२० मार्च २०२३) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा.ओमप्रकाश नागना...
(दि.२० मार्च २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना मास्टर्स गेम्स फेडरेशनद्वारे नाशिक येथे आयोजित पाचव्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत १०० मीटर्स फ्री मध्ये रौप्य पदक, ५० मीटर्स फ्री आणि ५० मीटर्स बॅक स्पर्धेत रजत पदक आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
जलतरण स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावरील तीन पदकांनी सन्मान प्राप्त झाल्याबद्दल प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉहरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, पर्यवेक्षक प्रा.उमेश चव्हाण,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, क्रीडा संचालक डॉ.मनोज पैंजणे, डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी, प्रा.नरेंद्र कंचटवार, प्रा.अर्जुन राऊत, प्रा.उत्तम केंद्रे, डॉ.बी.जी.देशमुख, डॉ.एकनाथ मिरकुटे, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा.एम.एस.कुलकर्णी, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, श्री.बालाजी गाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS