जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटणार ..... कंधार प्रतिनिधी १२ वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या...
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटणार .....
कंधार प्रतिनिधी
१२ वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या कारकिर्दीत कंधार शहरातील अतिक्रम हटाव मोहिमेमध्ये जवळपास ३५० व्यापाऱ्यांच्या दुकानावर हातोडा पडला होता. कंधार नगरपालिकेच्या वतीने व्यापारी संकुलाचे बांधकाम झाले आहे. या लिलावाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यापारी संकुलाचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २१ मार्च रोजी पाहणी केली.
कंधार शहरातील बाजारपेठ उद्धवस्त होऊन १२ वर्षे झाली व्यापाऱ्यांनी आशा सोडून दिली होती पण २०२२ मध्ये व्यापारी गाळ्याचा मार्ग मोकळा होऊन बांधकामाला आहे. सुरुवात होऊन ४० गाळ्याचे बांधकाम पूर्ण झाले असून या गाळ्यांचे बांधकामा कशा पद्धतीने केले यांचे यांची माहिती इंजिनियर देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.
गाळे कोणाला मिळणारा असा प्रश्न व्यापाऱ्यांना भेडसावत असताना जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की, दोन दिवसात याची बैठक घेऊन पुढील महिन्यात शासनाच्या लिलाव ऑनलाइन पद्धतीने महिनाभरात प्रक्रिया करणार पूर्ण
निविदेची जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात येणार आहे. या लिलावाचे दर निश्चिती झाल्याबरोबर पुढच्या आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करून पुढील महिन्यात लिलावाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
जिल्हा स्तरावरील समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, सहायक संचालक सदस्य म्हणून आणि मुख्याधिकारी असणार आहेत.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार अनुपसिंह यादव, पोलिस निरीक्षक आर. एस. पडवळ, मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर कारभारी, नायब तहसीलदार संतोष कामठेकर गुत्तेदार राजू भाऊ सोनकांबळे तसेच अधिकारी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

COMMENTS