29 मार्च महाराष्ट्र भवन दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री गजेंद्रसिंग शेखावत,केंद्रीय अर्थमंत्री डॉ भागवत कराड,पर्यावरण प्रमुख गोपाल ...
29 मार्च महाराष्ट्र भवन दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री गजेंद्रसिंग शेखावत,केंद्रीय अर्थमंत्री डॉ भागवत कराड,पर्यावरण प्रमुख गोपाल आर्य,खा.उन्मेष पाटील,खा गोपाळ शेट्टी,खा मनोज तिवारी,श्री सुनील देवधर,तिरुपती बालाजी देवस्थान त्रिदेव स्वामी,ब्राम्हकुमारी संचालिका आशा दीदी,अमेय साठे,संजय सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय जलप्रहरी पुरस्काराने बाबुरावजी केंद्रे यांना सन्मानित करण्यात आले आहे.तसेच नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले,जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनाही जलसंधारण कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
1999 पासून बाबुरावजी केंद्रे जलसंधारण क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांनी नागदरवाडी जलसंधारण मॉडेल तयार केले.त्याची दखल घेऊन त्यांना सत्यमेव जयते कार्यक्रमात सहभागी करण्यात आले.त्यांनी कित्येक गावांमध्ये जलसंधारणाची कामे करून गावे पाणीदार करण्यात सिंहाचा वाटा आहे.त्यांनी केलेले काम पाहून महेश कोठारे व्हिजन ने त्यांच्या जीवनावर पाणी हा मराठी चित्रपट निर्माण केला आहे,पाणी फिल्म च्या प्रोड्युसर प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा आहेत.
बाबुराव केंद्रे यांच्या कामात त्यांना नागदरवाडी माळाकोळीचे चे ग्रामस्थ,आई भिवराबाई,त्यांच्या पत्नी सुवर्णा,बंधू बालाजी केंद्रे ,सहकारी दिपक मोरताळे,मार्गदर्शक उपेंद्र कुलकर्णी,प्रमोद देशमुख,गिते यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
योग्य व्यक्तीचा सन्मान केंद्र सरकारने केला आहे ,त्यामुळे जनमानसात आनंद दिसून येत आहे.

COMMENTS