राम दातीर
माहूर(प्रतिनिधी )भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल जी गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावून तडका फडकी लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईच्या निषेधार्थ माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस संपर्क कार्यालयात आज दिनांक २५ रोजी निषेध बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या लोकशाही मधील महत्त्वाचा घटक असलेल्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याच्या केंद्र सरकारच्या कटकारस्थानाचा तीव्र निषेध करण्यात आला. दिनांक २८ मार्च २०२३ रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौकात निषेध मोर्चा व आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. तसेच युवक कॉंग्रेसच्या वतीने दि. ३१ मार्च रोजी जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे माहूर तालुकाध्यक्ष राठोड, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ.निरंजन केशवे तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप मुनगीलवार, माजी सभापती विश्वनाथ कदम,गोविंदराव मगरे पाटील,नगरसेवक प्रा. विलास भंडारे, अनिल माडपेलीवार, नगरसेवक प्रतिनिधी आकाश कांबळे, जयकुमार अडकिने, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सचिन बहिरे आदिंची उपस्थिती होती.

COMMENTS