राम दातीर
माहूर(प्रतिनिधी )स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी होणारअद्याप स्पष्ट नसले तरी, राष्ट्रवादी चे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मशागत सुरू केली आहे.
माहूर - किनवट मतदार संघात माजी प्रदीप नाईक यांच्या जनसंपर्क अभियाने सध्या जोर धरल्याने गावागावात मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसाद व पक्ष प्रवेशाने विरोधी पक्षाच्या पाया खालची वाळू सरकली आहे. काल माहूर तालुक्यातील दिगडी (धा) येथील
सरपंच गजानन पिलेवाड,ग्राम पंचायत सदस्य त्रिमक शिंदे,सुरेश खंदारे,व्यंकट टेकाळे,बालाजी टेकाळे,हारी अगिरकर,गोरे,विनोद गवळी,मारोती राठोड,संदीप कवाणे, विठ्ठल थोरात, माजी सरपंच माधव पाचपुते,विशंभर पिटलेवार, विस्वनाथ मेंडकेवार,दीपक गायकवाड, माणिक खंदारे,रवी कुलदीपके,प्रमिल शिंदे,माधव पिटलवाड,मारोती आगिरकर, नारायण नारेवाड, तुकाराम हातमोडे,करन गायकवाड,संजय पितलेवाड,विशाल पितलेवाड, ओमकार कचरे,विलास आढाव,राजू पितलेवाड,रवी आढाव,विश्वास माहुरे,गोपाळ राठोड,मारोती डाखोरे,अनुभव मेंडकेवार,अविनाश आढाव,मारोती पितलेवाड, अरविंद खरवडे,रामा आढाव, विनोद आढाव,प्रतिष इंगळे, रामा डाखोरे,संदीप हातमोडे यांनी पक्षात प्रवेश केला ,तर दहेगाव येथे गावातील नागरिक समाधान माझळकर,दीपक उघडे,देविदास कऱ्हाळे,फुलाजी दुमारे रामराव सरकुंडे,गणपत कोकाटे,देवराव मुरमुरे,जयवंत वाळके,भीमराव डुकरे,चंद्रकांत माझळकर,गणपत राजने,विलास हगवने,विष्णू मुरमुरे,नामदेव तरटे,गणपत बेले,संतोष माझळकर,संभाजी माझळकर,रामचंद्र डुकरे,शेषेराव हगवने,अनिल भांडगे,मारोती कोकाटे,विशाल भागव,शामराव बोथिंगे,ज्ञानेश्वर भांडगे,किरण भांडगे,विनोद दुमारे यांनी प्रदीप नाईक यांचे जल्लोषात स्वागत करून गावातील युवकांचा मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.या वेळी सरपंच तुकाराम तांबाटे,कुंदन पवार पाटील,प्रफुल्ल भुसारे यांची उपस्थिती होती.

COMMENTS