नांदेड.(विशेष प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नांदेड ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील काकांडी येथे २६ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
काकांडी येथील रक्तदान शिबिराचे मुख्य आयोजक सुदिन बागल पाटील तसेच त्यांच्या सहकारी पदाधिकारी व गावकरी मंडळींच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरूवार दि. २६ जानेवारी रोजी काकांडी (ता. जि. नांदेड) येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, काकांडी येथील रक्तदान शिबिराचे उदघाटन गतवर्षी रक्तदान केलेल्या महिला रक्तदात्या सखुबाई बागल, अंजना पोपळाईतकर, संगीता चितावार, लताबाई भागानगरे, रेखाताई बागल, चंद्रकला शेळके, सुरेखा बागल, मिरा कोल्हे, रेणुका बागल, शाहुबाई शिंदे, पूजा बागल, रूपा देवकर, अंजनाबाई बागल, दिपालीताई घोगरे, प्रतिभा पवितवार, कविता बागल, अरूंधती पवितवार, मनिषा बागल, शेवंता वल्लेप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी काकांडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात काकांडी व परिसरातील बहुसंख्य महिला तसेच पुरूष युवा रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन शिबिराचे मुख्य आयोजक सुदिन पाटील बागल व त्यांचे सहकारी मित्रमंडळी तथा समस्त गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS