हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर पोलिस ठाण्यात कार्यरत कर्तबगार पोलिस उपनिरीक्षक खार्डे यांची वसमत ठाण्यातील कामगीरी अतीशय उत्कृष्ट असुन त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्याला वाचा फोडण्याचे काम केले आहे. मात्र काल मार्केट कमीटी मतदान प्रक्रिया दौरान झालेल्या किरकोळ वादाला मोठे स्वरूप देऊन राजकिय द्वेषातुन एक कर्तबगार अधिकारी खार्डे यांच्यावर पोलिस मुख्यालयात सलग्न ची कारवाई करण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात दोन वर्षांच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्थे बरोबर जातीय सलोखा आबाधीत राखण्याचा प्रयत्न केला. कर्तव्याशी प्रमाणीक एकनिष्ठ असणारे खार्डे यांनी वसमत शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आनण्यासाठी मोठे प्रयत्न केले. वसमत शहरात तत्कालीन पोलिस निरीक्षक गुरमे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली होती. दिवसा ढवळ्या खुना सारखे गंभीर गुन्हे घडत होते. गुरमे यांच्या बदली नंतर वसमत शहर पोलिस ठाण्याचा पदभार पोलिस निरीक्षक कदम यांनी घेतल्यानंतर कदम व खार्डे यांनी वसमत शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणली. पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांनी अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळल्या. अज्ञात पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या म्रृतदेहाचा तपास करून कुठलाही पुरावा नसताना खुनाचा उलगडा करण्यास व आरोपी निष्पन्न करण्यात उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांना यश आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचे कौतुकही केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी जनावर तस्करी करणाऱ्या टोळीला स्वतः च्या जिवाची पर्वा न करता खार्डे यांनी अटक केली होती. यावेळी त्यांना हवेत गोळीबार ही करावा लागला होता. या कारवाई दरम्यान गो तस्करांनी केलेल्या दगड फेकीत एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. खार्डे यांनी वसमत येथे दोन वर्षांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केली होती. पण क्रृषी उत्पन्न बाजार समिती मतदान प्रक्रिये दौरान मतदान बुथवर झालेल्या किरकोळ वादाला मोठे स्वरूप देऊन राजकिय द्वेषातुन एक कर्तबगार पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली. वसमत शहरात गुन्हेगारी चे प्रमाण जास्त असल्याने आशा अधिकाऱ्याची वसमत शहराला गरज होती. राजकिय द्वेषातुन खार्डे यांची पोलिस मुख्यालयात सलग्न ची कारवाई झाली असली तरी वसमत शहरातील सामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
.jpg)
COMMENTS