नोव्हेंबर महिन्यात सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप 3 पोलिस ठाण्यात वसमत तालुक्यातील हटृटा पोलिस ठाण्याला प्रथम क्रमांक मिळाला असुन कुरूंदा पोलिस ठाण्याचा दुसरा तर कळमनुरीत तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे.सदर ठाणेदारांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रशस्तीपत्र, रोख बक्षीस जाहीर करून पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी ठाणेदारांचा गौरव केला आहे.
पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करणे, तक्रार अर्ज व प्रलंबीत प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करणे, चोरी छुपे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबविणे, तसेच जनता व पोलिस यांचा सुसंवाद वाढवा यासाठी ठाणे हद्दीतील गावांमध्ये विवीध उपक्रम राबविणे, दामीनी पथक पेट्रोलींग, पोलिस दीदी, पोलिस काका, भरोसा सेल, जातीय सलोखा, सामाजिक सदभावना वाढीसाठी कौमी एकता क्रिकेट स्पर्धा चे आयोजन , सतर्कता, रात्रीची गस्त व कोम्बींग आपरेशन इत्यादी माध्यमांतून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असुन जिल्ह्यातील सर्व 13 ही पोलिस स्टेशन वरील सर्व बाबीवर प्रभावी कामगिरी व्हावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी प्रत्येक महिन्याला सर्व पोलिस ठाण्याचे मुल्यांकन व सर्वंकष बाबींचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप 3 पोलिस ठाण्याची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे. सदर योजनेत नोव्हेंबर महिन्याच्या मासीक अहवालाचे व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या कामगिरी चे अवलोकन व मुल्यांकन करून उत्कृष्ट कामगिरी मध्ये हट्टा पोलिस ठाण्याचा पहिला क्रमांक तर कुरूंदा पोलिस ठाण्याचा दुसरा क्रमांक व आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तीनही ठाणेदारांना रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र पत्र व सी नोट जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी जाहीर केले आहे. पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या या उपक्रमाने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ठाणेदारांना प्रोत्साहन मिळत असल्याची माहिती कुरूंदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांनी ग्लोबल मराठवाडाशी बोलतांना सांगितले आहे.

COMMENTS