नवी मुंबई सानपाडा येथे दत्त जयंती निमित्त गाण्याच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
नवी मुंबईत सानपाडा येथे श्री. दत्त जयंती निम्मित टॅलेंट बॉक्स या यूट्यूब चैनल वर नवीन भक्तिमय " श्री. दत्त नामात जीव दंगला" या गाण्याचा प्रकाशन सोहळा , श्री. दत्त मंदिर सानपाडा याठिकाणी पार पडला. त्यावेळी सानपाड़ा गावचे मा. नगरसेवक व श्री. दत्त भक्त श्री. सोमनाथ चिंतामण वास्कर, सानपाडा देवस्थान समितिचे अध्यक्ष श्री. सदानंद कृष्णा पाटील, खजिनदार श्री. प्रकाश हरीचंद्र ठाकूर, सचिव श्री. धर्मेंद्र अनंत पाटील, श्री. किशोर सावंत -भोसले - डायरेक्टर टॅलेंट बॉक्स इव्हेंट व देवस्थान समितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला. 

सदर गीत सुप्रसिद्ध गायक श्री. मंदार आपटे हयांच्या आवाजात रेकोर्ड करण्यात आले आहे. सौ. दिशा काळे यांच्या लेखणीतून संगीतकार श्री. अशोक दादा वायंगणकर यांनी चांगली चाल दिली आहे. गाण्याचे संपूर्ण व्हीडिओ दिग्दर्शन श्री. दर्शन साटम यांनी केले आहे. 

संपुर्ण गाण्याची निर्मिती श्री. किशोर सावंत (भोसले), श्री उदय साटम, श्री मुद्स्सरनझर शिरगावकर याच्या Talent Box Event & Entertainment p. Ltd या कंपनी तर्फे केली आहे.

गाण्याचे ध्वनीमुद्रण आणि मिक्सिंग विधी व्हॉईस स्टुडिओ परेल या ठिकाणी श्री. श्रीकृष्ण सावंत यांनी केले आहे . दर्शन साटम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.अक्षय कदम यांनी गाण्याचे संपूर्ण व्हीडिओ एडिट केला आहे .

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या