अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांसाठी गुरुवारी कार्यशाळा


नांदेड ) दि. 29 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांसाठी गुरुवार 1 डिसेंबर 2022 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर 2020, 16 मार्च 2020 व 26 मार्च 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत असेही प्रसिद्धीपत्रकान्वये समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी कळविले आहे.


0000टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
इमेज