लातूर ( )लातुर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व महानगर पालिका क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालय स्पोर्ट अकॅडमी मध्ये टेनिसव्हाॅलिबाॅल खेळाचा प्रचार प्रसार करून दर्जेदार खेळाडू निर्माण करणे राज्य राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करणे या साठी लातूर जिल्हा टेनिसव्हाॅलिबाॅल असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून संघटनेच्या अध्यक्ष पदी सचिन शिंदे (सीए लातूर ) तर सचिव पदी आनंद घाडगे यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिस व्हाॅलिबाॅल महासंघाचे सरचिटणीस डॉ व्यंकटेश वांगवाड म्हणाले भारतीय टेनिसव्हॉलीबॉल खेळास चार जन्म महाराष्ट्र पुणे शहरातून झाला आहे. या खेळास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मान्येता दिली आहे. शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन २०१३ पासून होत आहे. या खेळांची जागतिक पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. लवकर आशिया क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणाऱ्या आहेत.
माजी क्रीडा उप संचालक तथा राज्य सल्लागार जनक टेकाळे, टेनिस व्हाॅलिबाॅल महाराष्ट्र असोसिएशन सचिव गणेश माळवे यांची उपस्थिती होती.
यावेळी लातूर जिल्हा टेनिसव्हाॅलिबाॅल असोसिएशनची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात आकाश कणसे उपाध्यक्ष संतोष शिंदे, राहुल पेटकर, सहसचिव तर सदस्य जितेंद्र पांगळ, सय्यद याकुब ,बालाजी कदम, विशाल सर, बिराजदार सर, विनोद जैन, यांची निवड करण्यात आली या वेळी मराठवाडा विभागीय सचिव रामेश्वर कोरडे सर तिरूके सर क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.

COMMENTS