सेलू:-
एमआयडीसी चा प्रकल्प हा सेलू तालुक्याच्या विकासासाठी उपयुक्त करणारा असेल, तसेच हदगाव पावडे परिसरातील जागा ही सर्व दृष्टीने अनुकूल आहे. दळणवळण ची साधने उपलब्ध आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र कुठेही जाऊ देणार नाही.या बाबतीत आपण तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेटून सविस्तर माहिती देणार आहोत असे माजी आ. हरिभाऊ लहाने यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.
या प्रकल्पातील भुसंपादनासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करू. शेतकरी बांधवाशी चर्चा करून त्यांना अपेक्षित मोबदला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू
कुठल्याही शेतकरी बांधवावर अन्याय होणार नाही.तर सामोपचारानेच हा प्रश्न मार्गी लावू असेही त्याने सांगितले.
सेलू एमआयडीसी करिता हादगाव पावडे येथे 95.85 हेक्टर,रवळगाव 212.35 हेक्टर प्रिंपुळा 28.61 हेक्टर असा 245.81हेक्टर जमिनीवर
एमआयडीसीला शासनाची या पूर्वी मंजुरी मिळाली आहे.
असा हा महत्वकांक्षी प्रकल्प सेलू तालुका व परिसरासाठी वरदान ठरणार असून आपण उद्या या बाबतीत मुख्यमंत्री महोदय यांच्या शी सविस्तर चर्चा करू असे सांगितले.

COMMENTS