*स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी बुध्दी व कौशल्याचा वापर करावा लागतो: साईराज बोराडे*
सेलू (. ) जिल्हा क्रीडाधिकारी परभणी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सेलू यांच्या वतीने आयोजित शालेय बुध्दीबळ व तायक्वांदो क्रीडा स्पर्धाचे शानदार उद्घाटन नूतन महाविद्यालय सेलू येथे दि. १९ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. याप्रसंगी यशवंत शिक्षण संस्था संचालक साईराज बोराडे म्हणाले कोणत्याही स्पर्धेत यशस्वीतेसाठी होण्यासाठी बुध्दी व कौशल्याचा वापर करावा लागतो, यांचा उपयोग दैनंदिन जीवनात होता. नियमित क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे असे उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर कान्हेकर, तर उद्घाटन साईराज बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे प्रा.डॉ नागनाथ गजमल , सिध्दार्थ कुलकर्णी, राजेश ढवळे, पर्यवेक्षक प्रा. नागेश कान्हेकर , तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे ,
याप्रसंगी प्राचार्य डॉ महेंद्र शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, प्रा. डॉ. निर्मला पदमावत, प्रा.के.के. कदम यांनी स्पर्धेस भेट दिली.
सदरील स्पर्धा १४/१७/१९/ वर्षांखालील मुले व मुली च्या गटात स्पर्धा संपन्न झाल्या.
स्पर्धेस पंच म्हणून सचिन शहाणे, राजेश ढवळे, सगीर फारुकी शुभम शहाणे, वाणीश्री रासकटला , किशोर ढोके, अश्विन केदासे, काम पाहिले.

COMMENTS