मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या कामगार सदस्य व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार श्रीमती कल्पना देसाई यांना यावर्षाचा आंतरराष्ट्रीय समुद्रमंथन पुरस्कार मिळाला आहे. याप्रसंगी मुंबई पोर्ट, जेएनपीटी, परादीप पोर्ट व दीनदयाळ पोर्टला पुरस्कार देण्यात आले. मुंबई पोर्टचा पुरस्कार मरीन खातेप्रमुख श्री. भाबतोश चांद यांनी स्वीकारला. याप्रसंगी विशेष पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर,भारतीय म्युझिक आणि कल्चर संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण माननीय पंडित
हरी चौरसिया, तर सन्माननीय पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचे लोकआयुक्त संजय भाटिया, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एन. एन. कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.
भांडारकर पब्लिकेशनचे कॅप्टन विवेक भंडारकर आणि एमएसीसीआयएचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वा आंतरराष्ट्रीय समुद्रमंथन पुरस्कार २०२२ हा सन्मान सोहळा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई पोर्टच्या डोमेस्टिक क्रूज टर्मिनल येथे संपन्न झाला. मेरीटाईम इंडस्ट्रीमध्ये ज्या पोर्ट, स्पोर्ट्स संलग्न संस्था आणि व्यक्ती यांनी उल्लेखनीय कार्य केले, अशा व्यक्तींना अवॉर्ड देऊन सन्मानीत करण्यात आले. यावर्षी मेरीटाईम २०२२ चा स्टार वूमन पुरस्कार श्रीमती कल्पना देसाई यांना देण्यात आला. कल्पना देसाई या मुंबई पोर्ट प्राधिकरणामध्ये कार्यरत असून, त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी आयएलओ, आयटीएफ आणि एचएमएस या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कामगार संस्थांमध्ये कामगारांचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबई पोर्टच्या दीडशे वर्षाच्या इतिहासात कल्पना देसाई या मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या प्रथमच एकमेव महिला कामगार सदस्य झाल्या आहेत. त्यांच्या कामगार चळवळीतील या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS