'बाप'हा पायाचा दगड असतो.मायेचा पाझर असतो.तोच जर घसरला तर डोलारा ढासळतो.दुःखाचा डोंगर कौसळतो.तसाच डोंगर कंधार तालुक्यातील मंगलसांगवी च्या कदम कुटुंबीयावर आज कोसळला आहे .
९आँक्टोंबर रोजी कदम कुटुंबीयाचा मातृहृदयी कवच असणारे कडाजीराव शेषराव पाटील कदम यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निघून गेले .नांदेड च्या गोदावरी हाँस्पपीटल मध्ये तेरा दिवस राहून उपचार घेत असताना आज प्राणज्योत मालवली.मुर्ती लहान पण किर्ती महाण असणाऱ्या व्यक्तीमत्वाची साधी राहणी उच्च विचार सरणी होती .कुटुंब वत्सल माणसाने चांगले छंद ही जोपासले.मनमिळावू स्वभावाने गावात सर्व धर्माची माणसे जोडलेली आहेत .शेवटच्या स्वासापर्यंत स्मरणशक्ती चांगली राहिली .माणसं ओळखून बोलत राहिले .गावातल्या भजन -कीर्तनात आयुष्यभर रमले.तरूण वयात नाटकात सहज -हसत खेळत बिनतयारीचे प्रसंगानुसार विनोद करून लोकांना खळखळून हसवत असत.ह्या कलावंतानी गावातील पहाटेची काकड अरती कधी चुकू दिली नाही .आपल्या सुंदर हातानी मृदंगातून नादबृम्ह निर्माण करायचे.गाव परिसरातील लोकांच्या कानात मंदिरातील तबल्याचे बोल त्यांचे आता ऐकू येणार नाहीत .सद्या टी.व्ही.,मोबाईलमुळे ग्रामीण कलावंत आता कमी होत असताना असे कलावंत निघून जाणे ही समाजाची खूप मोठी हानी आहे .किरकोळ शरीर यष्टीचा हा माणूस अत्यंत काटक,चपळ होता.दोन -तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे .त्यांच्या शेतातील खांबावरील विद्युत तार तुटलेली होती .त्यांनी लाईनमनला मदतीला घेऊन ते स्वतः खांद्यावर सरसर चढून जाऊन स्वतः तार जोडलेली आहे .आता एक महिन्यापुर्वी शेताकडे जाऊन विहिरी वरील मोटार चालू करून पीकाला पाणी दिले आहे .काळ्या मातीवर,मुक्या प्राण्यांवर जीव लावणारा लळा लावणाऱ्या माणसांनी गावातील सर्व जाती धर्मातील वयाने लहान मोठ्या मित्र शेवट पर्यत टिकून टेवले .ते सारे दवाखान्यात पाहावयास आले.चाणाक्ष बुध्दीचा ह्या माणसाने सर्वांना दाद दिली.त्यांच्यात हजर जबाबीपणा होता.थोडक्यात पण महत्त्वाचे ,कामाचे बोलणे .न पटणारया सोबत कधी वेळ गमवला नाही .जीवनातील कधी यशापयात कोणापासी हात पसरला नाही .अडचणीचा बाऊ करणे कधी त्यांना जमलेच नाही .प्रतिकुल परिस्थितीत ही मार्ग काढत मुलाबाळांना शिकविले.
दोन मुली कृष्णाबाई मोरे बाभुळगाव ,छबुबाई भरकडे कामळज व दोन मुले एक परिवर्तनशील चळवळीत काम करणारा पंडितराव कदम व हनुमंत कदम यांना घडविले .त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांची सून रेखाताई काळम (कदम)क्लास वन अधिकारी घडली .जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सद्या नांदेड जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी (म.बा.)मध्ये आहेत .आपली सून जिल्ह्याची अधिकारी म्हणून त्यांना खूप अभिमान वाटायचा.आयुष्यभर सूनेलाही " माय" म्हणून हाक मारायचे.मुलीचे प्रेम देणारामातृहृदयी "बाप" कुटुंबाचे कवच होते.मुलासाठी न लाजता काम करणारा माणूस आज समाधानी होता. दि.१० आँक्टोंबर रोजी मंगलसांगवी येथे ११.३० वाजता अत्यसंस्कार होणार आहे .ह्या निरपेक्षवृतीने जगणाऱ्या व्यक्तीमत्वास भावपुर्ण श्रध्दाजंली ...!
पंडित पवळे ,नांदेड
मो.9890232962

COMMENTS