सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्यावतीने मंगळवार ( दि.११ ) रोजी साई नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता कार्यसन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती सत्कार समारंभाचे संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी दिली. या कार्यसन्मान कार्यक्रमात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांना महेश भुषण पुरस्कार, ललिता गिल्डा यांना विशेष सेवा पुरस्कार आणि उद्योजक रामप्रसाद घोडके यांना परमवीर अब्दुल हमीद पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचा ज्येष्ठ विधीज्ञ ॲड अशोक सोनी यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे असतील. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर यांच्या मार्गदर्शनात विविध समित्या परिश्रम घेत आहेत.

COMMENTS