नायगाव कृषी विभागाचा खळबळजनक प्रकार नायगाव प्रतिनिधी : नायगाव येथील तालुका कृषी कार्यालयातील गोडाऊन मध्ये काळ्या बाजारात विक्री करण्याच...
नायगाव कृषी विभागाचा खळबळजनक प्रकार
नायगाव प्रतिनिधी :
नायगाव येथील तालुका कृषी कार्यालयातील गोडाऊन मध्ये काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या साहित्याचा पुराव्यासह पर्दाफाश केल्यानंतर गोदामातील साहित्य गायब झाल्याची प्राथमिक माहिती असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून दि.१४ सप्टेंबर रोजी तहसीलच्या कर्मचाऱ्यांसमक्ष कृषीच्या गोडाऊन ची तपासणी करण्यात आली यामध्ये अनेक प्रकारचे औषधे,बियाणे,औजारे व साहित्य शेतकऱ्यांना वाटप न करता दडवून ठेवल्याचे आढळून आले यामुळे विविध वृत्तपत्रांसह
बातमी छापून नायगाव कृषी विभागाचा पर्दाफाश केला होता यामुळे या बातमीचा धसका घेऊन गोदामातील साहित्य गायब केल्याची प्राथमिक माहिती आहे हा सर्व प्रकार संशयास्पद असून नायगाव च्या तहसीलदारांमार्फत केलेल्या गैरहजर पंचनाम्याचा अहवाल सादर केल्यानंतरही जिल्हा कृषी अधीक्षक यांनी कोणतीच कारवाई न करता पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोत्तेवार व माधव बैलकवाड यांनी केली आहे

COMMENTS