नायगाव/नागेश कल्याण.
तालुक्यात सायंकाळी बुधवार रोजी 3:30 ते 05:30 च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन ज्वारी सह इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेकांच्या सोयाबीनच्या गंजीत ही पाणी घुसले आहे. सोयाबीन च्या कडप्प्या पाण्यात थिजत आहेत. तर काहींच्या शेतीला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतीसह शेती पिकांचे ही प्रचंड नुकसान झाले आहे.
यंदाचा पाऊसकाळा शेतकऱ्यांसाठी सुरुवाती पासूनच नुकसान कारक राहिला सुरुवातीस कमी अधिक पावसामुळे पेरण्या खोळंबल्या, तर जिथे पेरणी झाली तिथे दुबार तीबार पेरणी करून ही झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान केलेले आहे. आज मीतीला शेतीत केलेला लागवड खर्च ही वापस येण्या जोगे नसताना आता पीक काढायच्या वेळात सातत्याने रोजनिशी होत असलेल्या पावसामुळे हाती तोंडाशी आलेले पीक ही आता घरा पर्यंत येईल का नाही याची खात्री नाही. यामुळे यंदाची दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न येथील शेतकरी वर्गा पुढे निर्माण झाला आहे. अशाच नैराश्यातून गेल्या दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील नरंगल येथील शेतकर्यां ने आपली जिवन यात्रा संपवली याच शेतकऱ्यां बाबत ही स्थिती आहे असे नाही तर तालुक्यातील बहुतांश शेतकरीवर्गा ची हीच गत आहे. यामुळे येथील शेतकर्यांची पीक विम्याच्या येणार्या पैशाकडे ही मोठी आस लागली आहे. अशातच सदर नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी पीक विमा कंपनीचे काही केल्या फोन ही लागत नाहीत आणि online app ही चालत नसल्याने शेतकरी बेचैन आहेत.
-------------------------------------------------------
आता दुष्काळ अनुदान आणि पीक विमा हाच शेतकर्यांचा आधार -गजानन पवार.
हाती आलेलं सगळाच पावसाने नेल.. सतत नापिकी, दुष्काळ, आणि वाढता शेती खर्च, लहरी पाऊस, शासनाच्या उदासीन धोरणामुळे घसरलेले बाजारभाव शेतकर्यांच्या जगण्यात आता नित्याचेच झाले आहे.यंदा तर अधिकच पावसाने थैमान घातल्याने शेतातील काही घरा पर्यत येईल ही आशा ही उरली नाही. त्यामुळे शेतकर्यांसाठी शासकीय मदत आणि पीक विमा हाच जगण्याचा आधार उरला आहे त्यासाठी तोंडावर आलेल्या दिवाळीसना पूर्वी मायबाप सरकारने मदत करावी नाहीतर यंदा ही या मतलबी सरकारच्या नावाने शेतकरी काळी दिवाळी साजरी करेल.

COMMENTS