राष्ट्रचेतना-2022 या अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात लोकशाहीर वामनदादा कर्डक या मुख्य मंचावर स्पर्धकांनी पोवाडा या कलाप्रकारातून सामाजिक...
राष्ट्रचेतना-2022 या अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात लोकशाहीर वामनदादा कर्डक या मुख्य मंचावर स्पर्धकांनी पोवाडा या कलाप्रकारातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि महापुरुषांची गौरवगाथा व्यक्त करणारे पोवाडे सादर करीत प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे केले.
महात्मा बसवेश्वर लातूरच्या विद्यार्थ्यांनी गाथा बळीराजाची हा पोवाडा सादर करीत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्न समोर आणला. नम्रता वाघमारे, स्वाती स्वामी, उर्मिला काळे, ज्ञानेश्वरी माळी, मानसी मन शेट्टी, अनघा मुळे यांनी हा पोवाडा सादर केला .तर एमजीएम महाविद्यालय नांदेडच्या कलावंतांनी स्त्रीभ्रूण हत्या या सामाजिक ज्वलंत प्रश्नावर पोवाडा सादर केला. त्यामध्ये मधुरा महाजन, वैष्णवी घुगे, सेजल बंडेवार, राधिका पायरे, अक्षदा उगले, रोहिणी यांनी हुबेहूब वेशभूषेत हा पोवाडा सादर केला महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या विश्वनंदा नरवंशी, वैष्णवी स्वामी, संघर्ष गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून रोमांच उभे केल. पोवाडा या कलाप्रकारात कलावंतांनी राष्ट्र चेतना जागवणारे पोवाडे सादर करत आणि ऐतिहासिक घटना सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
COMMENTS