राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघास तिहेरी मुकुट*

[: फोटो ओळ:- तामिळनाडू येथे टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र राज्य विजेत्या संघा समावेश टेनिस व्हॉलीबॉल खेळांचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, प्रफुल्ल...
[: फोटो ओळ:- तामिळनाडू येथे टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र राज्य विजेत्या संघा समावेश टेनिस व्हॉलीबॉल खेळांचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, प्रफुल्लकुमार बन्सोड, नागेश्वर राय,हरिदंरसिंग, प्रशिक्षक सतिश नावाडे, सय्यद सिकंदर, स्नेहा जाधव, प्राची कडणे, मंदार कुस्टे


राज्य संघास ३सुवर्ण,१ रौप्य,१ कांस्यपदक

सेलू (. ) टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया मान्यतेने तामिळनाडू टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने दि. ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान तिरुचिरापल्ली तेथे २४ वी राष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. देश भरातून १९ राज्य संघांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सबज्युनिअर मुली:- सुवर्ण पदक, ज्युनिअर मुली:- सुवर्णपदक , ज्युनिअर मिश्र दुहेरी: सुवर्णपदक, सबज्युनिअर मिश्रदुहेरी:- रौप्यपदक, सबज्युनिअर मुले:- कांस्यपदक प्राप्त केले. 

    ज्युनिअर मुली गटात अंतिम सामना महाराष्ट्र वि.गुजरात अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र संघाने २-१ सेट मध्ये निकीता थावरे, निता थावरे, अंकिता थावरे, अव्हानी जाधव, या खेळाडूंनी विजय खेचून आणला.

मिश्र दुहेरीत गटात अंतिम महाराष्ट्र वि आंध्रप्रदेश दरम्यान २-० सरळ सेटमध्ये रावल जान्हवी व यादव अविंनीश जोडीने सुवर्णपदक पटकावले.

        सबज्युनिअर मुली च्या गटात अंतिम लढत महाराष्ट्र वि. तेलंगणा दरम्यान अतितटीच्या लढतीत २-१ अशा कर्णधार दिपाली देशमुख,समीक्षा कदम,स्नेहा थावरे, राधा वारुळे, महेक बागवान, साईसमीता जवळकर, या खेळाडूंनी विजय खेचून आणला. 

सबज्युनिअर मिश्रदुहेरी गटात अंतिम सामना आंध्रप्रदेश वि महाराष्ट्र दरमान्य २-१ असे सेट मध्ये महाराष्ट्र राज्य संघास पराभूत होऊन रौप्यपदक सय्यद साद सादिक व वैष्णवी काकडे या जोडीने पटकावले. 

       सबज्युनिअर मुले गटात उपांत्य फेरीत पराभूत होऊन कांस्यपदका साठी यजमान तामिळनाडू सोबत झुंज देऊन महाराष्ट्र राज्य संघास कांस्यपदक पटकाविले यात कर्णधार माळकर सार्थक ,दुधाटे विशाल ,गायके उमेश ,ठाकरे हिमांशू, गायकवाड अनिकेत ,गायके आर्यन.यांचा समावेश होता. 

ज्युनिअर मुलांच्या संघांनी साखळी सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. यात कदम विठ्ठल चुडावकर महेश ,थावरे गोविंद ,थावरे हर्षवर्धन ,परीयार आयुष 

पवार शुभम यांचा समावेश होता. 

 या संघास मार्गदर्शन सतिश नावाडे, सय्यद सिकंदर (परभणी), स्नेहा जाधव (अकोला), प्राची कडणे(सांगली), संघ व्यवस्थापक मंदार कुस्टे (कोल्हापूर)यांचे लाभले.सर्व खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन टेनिस व्हॉलीबॉल आंतरराष्ट्रीय महासंघाचे महासचिव: डॉ.व्यंकटेश वांगवाड.

राज्य अध्यक्ष:- सुरेशरेड्डी क्यातमवार,राज्य चिटणीस: गणेश माळवे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष: अनिल सोनवणे, 

  उपविभागीय अधिकारी सौ.अरणा संगेवार, नगरपरिषद सेलू मुख्याधिकारी देविदास जाधव, नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, नूतन संस्थेचे डॉ.एस.एम लोया, सचिव माजी प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, मुख्याध्यापक नारायण सोळंके,प्रा.नागेश कान्हेकर, राज्य सदस्य संजय ठाकरे, रामेश्वर कोरडे यांनी केले

  पुर्ण....

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group