मुदखेड.(ता. प्र.)
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. असे असले तरी मराठवाड्यातील जनतेला देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी मुक्तता मिळाली नव्हती. मराठवाड्याला खरे तर एकाचवेळी दोन शत्रू होते. एकीकडे इंग्रज तर दुसरीकडे निजाम. या दोन्ही शत्रूंशी लढत मराठवाड्यातील जनतेने हा लढा यशस्वी केला. निजामाच्या विरुद्ध सविनय कायदेभंगाची चळवळ लढल्या गेली . यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आणि देश स्वतंत्र झाल्यावर तब्बल एक वर्षांनी मराठवाडा स्वतंत्र झाला. समाज विघातक गोष्टी बाजूला सारण्याबरोबर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे, आज पासून मराठवाडा मुक्ती दिनाच्याही अमृत महोत्सवाला प्रारंभ होत असून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीला ज्ञात असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार सुजित नरहरे यांनी येथील तहसील कार्यालयात आयोजित मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले. यावेळी मयत स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस पत्नी श्रीमती जिजाबाई गजरे, भागीरथाबाई नटुरे, या महिलांचा शासनाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदार सुजित नरहरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने तालुका स्तरावरील प्रशासकीय ध्वजारोहणही तहसीलदार सुजित नरहरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष उद्धवराव पा. पवार, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे , नायब तहसीलदार संजय नागमवाड, शिवाजीराव जोगदंड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर गोडघासे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सल्लागार लक्ष्मणराव देवदे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख नारायणराव चौदंते, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव संजय कोलते, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना संघटनेचे जिल्हा सल्लागार माजी न.प . उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांच्या पुढाकारातून व संस्थाचालक राजीव हळदे यांच्या समन्वयातून शैक्षणिक साहित्याचे वाटप तहसीलदार सुजित नरहरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविकातून युनिव्हर्सल प्रशालेच्या शैक्षणिक वाटचालीची सविस्तर भूमिका संस्थाचालक राजीव हळदे यांनी विशद केली. यावेळी माजी सैनिक देवराव चौदंते, सुनील चौदंते, प्रभाकर घोंगडे ,शशिकांत मोडावन, विकास बलफेवाड , संजय चव्हाण, देविदास पवार, बालाजी गव्हाणे, साईनाथ राठोड, पालक प्रतिनिधी चंद्रकांत हनुमंते, गिरीश एडके, अरुण टोम्पे, यांच्यासह अन्य पालकांची उपस्थिती होती. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव संजय कोलते यांनी युनिव्हर्सल प्रशालेने तालुकास्तरावर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण प्रणालीमध्ये शैक्षणिक गुणवत्तेत सदैव अग्रेसरपणा कायम ठेवला असून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक विद्या संकुल वरदान ठरले असल्याचे सांगत उपस्थितांना प्रभावित करणारी मराठवाडा मुक्ती दिनाची सविस्तर यशोगाथा आपल्या मनोगतातून मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिव्हर्सलच्या प्राचार्य सौ.पार्वतीताई हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिव्हर्सल विद्या संकुलातील उपप्राचार्य वर्षा चंद्रे, पुष्पा भालेराव, बालाजी कुसुमवाड, विशाल पतंगे, सुनील जाधव, सुरेखा बीरकलवाड , रत्नमाला चौदंते, शिल्पा जाधव, अन्य शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे संस्थाचालक राजीव हाळदे तर शालिय शिक्षण समितीचे सदस्य संतोष दर्शनवाड यांनी आभार मानले.
ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप फुगारे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक महेश शर्मा, तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात तालुकाध्यक्ष उद्धवराव पाटील पवार , यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले.

COMMENTS