नांदेड:( दि.२१ ऑगस्ट २०२२) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सव २०२२-२३ निमित्त सत्रारंभ व्याख्य...
नांदेड:( दि.२१ ऑगस्ट २०२२) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सव २०२२-२३ निमित्त सत्रारंभ व्याख्यान व परिसंवादाचे आयोजन दि. २३ ऑगस्ट २०२२, मंगळवार रोजी सकाळी ११:०० वा. कुसुम सभागृह, आय टी एम परिसर, नांदेड येथे केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री, माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व संस्थेचे सचिव मा.डी.पी.सावंत यांची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणेचे मुख्य प्रवर्तक डॉ. विवेक सावंत यांचेही मार्गदर्शन या निमित्ताने मिळणार आहे.
डॉ.राजन वेळुकर हे भारतातील शिक्षण तज्ञ,अनुभवी जाणकार योजनातज्ञ, कार्य कुशल कुलगुरू, विद्यार्थी दक्ष व विद्यार्थी केंद्री योजना अंमलात आणणारे भाष्यकार म्हणून जाणले जातात. छत्तीस वर्षांपासून शिक्षणाच्या अभ्युदयासाठी ते प्रयत्नशील आहेत. डॉ. राजन वेळुकर हे २००४-२००९ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे कुलगुरू म्हणून कार्यरत होते.२००२ ते २००३ मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे उपसचिव म्हणून कार्य पार पाडले आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (२०१० ते २०१५) म्हणून त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे . २०२०-२०२१ मध्ये AURO विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सध्या ते ॲटलास स्किल टेक युनिव्हर्सिटी, मुंबई येथे विद्यमान कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी विविध समितीचे अध्यक्ष व सदस्य म्हणून काम केले आहे.विद्यापीठ अनुदान आयोग, नॅक,नॅशनल नॉलेज कमिशन इत्यादी महत्त्वपूर्ण समित्यावर त्यांनी यशस्वीपणे कार्य केले आहे.
यशवंत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कुसुम सभागृहामध्ये त्यांचे व्याख्यान ११:०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या सुवर्णसंधीचा नांदेड मधील विद्यार्थी ,शिक्षक ,प्राध्यापक व शिक्षण प्रेमींनी अवश्य लाभ घ्यावा; असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केले आहे.


COMMENTS