मुखेड / प्रतिनिधी तालुक्यातील मौजे कापरवाडी येथील वि.का. सेवा सहकारी संस्था सोसायटीच्या चेअरमनपदी हणमंत गोणेवाड, व्हाइस चेअरमनपदी प्रक...
मुखेड / प्रतिनिधी तालुक्यातील मौजे कापरवाडी येथील वि.का. सेवा सहकारी संस्था सोसायटीच्या चेअरमनपदी हणमंत गोणेवाड, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश सेमेटवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय मुखेडचे सहकार अधिकारी ए.बी. राठोड, सेकेटरी बालाजी ईबितदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या मार्गदर्शनात रविवार दि. २१ आॅगस्ट रोजी वि.का. सेवा सहकारी संस्था कापरवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी हणमंत गोणेवाड, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश सेमेटवाड यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सोसायटी सदस्य महाजन अनमुलवाड, अनुसयाबाई धारासुरे, मारोती पेनलेवाड, गंगाधर बळेगावे, अविनाश यरकलवाड, आनंद गोणेवाड, रतनाबाई धारासुरे, आस्मतबी शादुल शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्यांचा सत्कार जेष्ठ नेते जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, माजी सरपंच प्र.लिंगुराम पेनलेवाड, शिवाजी अनमुलवाड, संभाजी धारासुरे, विद्याधर पेनलेवाड, डाॅ.रमेश सेमेटवाड, अशोक सेमेटवाड, दिगांबर गोणेवाड, शंकर धारासुरे, राजेंद्र पेनलेवाड, विजय अरबड बोमनाळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कापरवाडी, पांडुर्णी, आडमाळवाडीचे गावकरी उपस्थित होते.
.jpg)
COMMENTS