राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण कार्यालयात भोसीकरांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड/प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दि. 15 ऑगस्ट रोजी भाग्यनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण कार्यालयात राष्ट्रवादी काँ...

नांदेड/प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दि. 15 ऑगस्ट रोजी भाग्यनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहराव भोसीकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मोहम्मद खान पठाण, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, डॉ. परशुराम वरपडे, तालुकाध्य उत्तमराव पाटील आलेगावकर, बालासाहेब मादसवाड, रमेश गांजापूरकर, शरद जोशी, धनंजय सुर्यवंशी, बालाजी पांचाळ, रविंद्रसिंघ पुजारी, प्रा. नारायण शिंदे, रामदास जाधव, सुनील पतंगे, एकनाथ जाधव, अ‍ॅड. प्रियंका कैवारे, मीना पेठवडजकर, संतोष दगडगावकर, गजानन पांपटवार, पांडूरंग काकडे, प्रकाश मांजरमकर, कैलास कदम, संभाजी सुर्यवंशी, विश्‍वांभर भोसीकर, माधव पवार, अभिजीत मुळे, सुभाष रावणगावकर, मधुकरराव पाटील पिंपळगावकर, प्रियंका मुटकुळे आदी जणांची उपस्थिती होती.

विनायकराव मेंटेना श्रद्धांजली
ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मराठा समाजाचे नेते दिवंगत विनायकराव मेटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष भोसीकर म्हणाले की, विनायकराव मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय दिला. ते लढवय्या नेते होते. राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या सोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना काम केले. ते अत्यंत विश्‍वासू होते. आदी स्वरूपाचे मनोगत व्यक्त करून विनायक मेटे यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

भोसीकरांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दि. 15 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी संचालक मोहनराव पाटील टाकळीकर, राजेश पावडे, विजयाताई शिंदे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम, सर व्यवस्थापक एम.टी. शिंदे, सर्व विभागप्रमुख व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.
तसेच महाराष्ट्र स्टेट कॉ.ऑप.हाऊसिंग फायन्सस नांदेड येथे कार्यालयात हाऊसिंग फायन्ससचे हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते दि. 15 ऑगस्ट ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी माजी सभापती भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, साहेबराव मोरे, माधवराव पवार, मधुकरराव पिंपळगावकर, आर.के. दाभाडकर, विश्‍वांभर भोसीकर, जिल्हा व्यवस्थापक मिर्झा बेग यांच्यासह इतर कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.
Attachments area

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel