पोदार इंटरनॅशनल स्कूल,नांदेड या शाळेत स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या स्वातंत्र्य दिनी महात्मा गां...
पोदार इंटरनॅशनल स्कूल,नांदेड या शाळेत स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या स्वातंत्र्य दिनी महात्मा गांधी व डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे प्राचार्य डॉ. संदीप कुमार लठ यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले माजी शैक्षणिक अधिकारी एन.जी.कांबळे व इतर मान्यवर तसेच उपस्थित विद्यार्थी,पालक,शिक्षक वृंद यांच्याद्वारे ध्वजास मानवंदना देण्यात आली.
या वेळी शाळेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे प्रसिद्ध असे 'वंदे मातरम' या गीताच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर नृत्य,नाटक अशा राष्ट्रभक्ती वाढवणाऱ्या कालाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली.
अधिक कालावधीसाठी आपली सेवा समर्पित केल्या प्रीत्यर्थ रिना नायर मीनाक्षी अय्यर,कीर्ती बिराजदार, नितीन कंधारकर,रहीम बागवान,पूनम चौधारी,खुशविंदर कौर संधु या शिक्षिकांना शाळेचे प्राचार्य डॉ. संदीपकुमार लठ यांच्या हस्ते लॉयल्टी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेचे प्राचार्य डॉ. संदीपकुमार लठ उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करत स्वातंत्र्य दिनाचे महत्व व विद्यार्थ्याची जबाबदारी या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

COMMENTS