नांदेड. (विशेष प्रतिनिधी) मुखेड तालुक्यातील मोटरगा येथील जेष्ठ नागरिक पुंडलिकराव ईरबाजी जोंधळे (वय- ७२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने १४ ऑगस्ट र...
नांदेड. (विशेष प्रतिनिधी) मुखेड तालुक्यातील मोटरगा येथील जेष्ठ नागरिक पुंडलिकराव ईरबाजी जोंधळे (वय- ७२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने १४ ऑगस्ट रोजी पुणे येथे निधन झाले. दिवंगत पुंडलिकराव जोंधळे यांच्या पार्थिव देहावर १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मोटरगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. मोटरगा येथील गंगाधर जोंधळे, संजय जोंधळे, भिमराव जोंधळे, रमेश जोंधळे, हुलबा उर्फ किरण जोंधळे व गौतम जोंधळे यांचे 'ते' वडील, तर सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ जोंधळे यांचे काका आणि जिवाजी खंडेराव राजूरकर यांचे 'ते' व्याही होत.

COMMENTS