यशवंत महाविद्यालयाचा ऐतिहासिक वास्तू स्वच्छता
कार्यक्रमामध्ये सहभाग
( दि.१३ ऑगस्ट २०२२)
श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा एक भाग म्हणून ऐतिहासिक वास्तू स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ठीक ११ वाजता विद्यार्थ्यांनी यशवंत महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने श्रमदानामध्ये सहभाग घेतला.
प्रस्तुत स्वच्छता मोहीम कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नांदेड शहरातील ऐतिहासिक वास्तू अर्थात हुजूर साहेब नांदेड सचखंड गुरुद्वारा येथील स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी व त्या ठिकाणी कशा पद्धतीने श्रमदान करावे, या संदर्भात मार्गदर्शन केले .
ऐतिहासिक वास्तु स्वच्छता मोहीम कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.आर.भोसले, डॉ.मीरा फड ,डॉ.दिगंबर भोसले तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे
( दि.१२ ऑगस्ट२०२२)
श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचा एक भाग म्हणून हर घर तिरंगा फ्रीडम जॉईन रॅलीचे आयोजन भारत सरकार, मिनिस्टर ऑफ हायर एज्युकेशन आणि महाराष्ट्र शासन तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने केले होते.
प्रस्तुत हर घर तिरंगा फ्रीडम जॉईन रॅलीमध्ये यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना या दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
प्रस्तुत रॅलीचा प्रारंभ कलेक्टर ऑफिसपासून झाला तर गुरुगोविंद सिंघ स्टेडियममध्ये राष्ट्रगीताने सांगता झाली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रॅलीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बी.आर.भोसले, डॉ.मीरा फड ,डॉ.दिगंबर भोसले तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.रामराज गावंडे यांनी स्वयंसेवक व कॅडेटसह मोठ्या संख्येने यशस्वीरित्या सहभाग नोंदविला.

COMMENTS