*नवी मुंबईतील सानपाडा येथील मस्जिद विरोधी आंदोलनाचा विजय*

नवी मुंबईतील सानपाडा येथील अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान व सानपाडा रहिवाशी महासंघाच्या वतीने मस्जिद बांधण्या विरोधात सर्व पक्षांच्या व ...



नवी मुंबईतील सानपाडा येथील अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान व सानपाडा रहिवाशी महासंघाच्या वतीने मस्जिद बांधण्या विरोधात सर्व पक्षांच्या व राहिवाश्यांच्या वतीने आज सानपाडा कडकडीत बंद पाळण्यात आला होता, या आंदोलनाची नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजित बांगर व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी गंभीर दखल घेऊन संभाव्य मस्जिद स्थळाला भेट दिली, त्याप्रसंगी महासंघाच्या शिष्टमंडळाने या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले, त्यावेळेस आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.   

या शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजणे, सचिव घनश्याम काळे शिवसेना शाखाप्रमुख अजय पवार, महासंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब महाले, संतोष पाचलाग, अजय मुडपे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्याराव, महेश बनकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप, भाऊ भापकर, मंदाकिनी कुंजीर, नगरसेवक सोमनाथ वास्कर, शिवसेना शाखाप्रमुख बाबाजी इंदोरे उपस्थित होते. विभागीय उपायुक्त श्री. ठाणेकर यांनी उपोषणकर्त्यांना ऊसाचा रस पाजल्यानंतर सर्व राहिवाश्यांच्या परवानगीने उपोषण मागे घेण्यात आले. या आंदोलनात भाजपाचे जिल्हा प्रमुख भगत, सतीश निकम, भाऊ भापकर, सुनील कुरकुटे, पांडुरंग आम्ले, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे, मनसेचे काळे, डॉ. संजीव मुखर्जी, सुनील चव्हाण इत्यादी नेत्यांचा व राहिवाश्यांचा मोठा सहभाग होता.

  मस्जिद विरोधातील आंदोलनाबाबत थोडक्यात माहिती अशी की, सन २००१ पासून सिडको प्रशासनांने मशिदीकरिता दिलेल्या भूखंडाला वेळोवेळी लेखी स्वरूपात विरोध केलेला आहे.त्याचबरोबर सन २०१३ सन २०१६ आणि सन २०१८ मध्ये तीव्र निषेध मोर्चा, रस्ता रोको, सामूहिक मुंडण इत्यादी आंदोलनाने करून सर्व सानपाडा वासीयांनी आपला तीव्र विरोध प्रदर्शित केलेला आहे. संबंधित समाजाची अत्यल्प लोकसंख्या , भूखंडाचे आरक्षण बदलून चुकीच्या पद्धतीने भूखंड संबंधित संस्थेला बहाल केल्याबाबत , तथाकथित पोलिसांची पोलीस नाहरकत , संबंधित जागेची विकास आराखडा , लेआऊट चौकशी, मूलभूत सुविधांचा म्हणजेच पाणी, ड्रेनेज, वाहतूक यांचा बीजवारा उडणार आहे. यामुळे सर्वात मोठा उद्भवणारा कायदा व सुव्यवस्था प्रश्न इत्यादींचा समावेश आहे. आज हा जन आक्रोश अंतीमता लाक्षणिक उपोषण व सानपाडा कडकडीत बंद या माध्यमातून सिडको, नगर विकास मंत्रालय,नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी दखल घेऊन त्वरित सदर भूखंड क्रमांक १७ अ, सेक्टर ८, सानपाडा हा मस्जिदकरिता दिलेला भूखंड रद्द करून त्याचा अन्यत्र विचार व्हावा, अशी मूळ मागणी आहे, मात्र आजच्या आंदोलनाने सिडको व नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मागण्यांची दाखल आंदोलनाच्या ठिकाणी व संभाव्य मस्जिद स्थानी येऊन घेतली, त्यामूळे प्रशासन लवकरच सानपाडा राहिवाश्यांची ही मागणी मान्य करतील अशी आशा आहे, मात्र ही मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असे आंदोलन कर्त्यांनी जाहीर केले.

आपला

मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group