लातूर/प्रतिनिधी
देशात जातीयता संपून समता प्रस्थापित होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्प्रयास करून शंभर वर्षे उलटून गेली. फुले-शाहू- आंबेडकरी समाजा
शिवाय इतर समाज घटकांनी समता प्रस्थापित करण्यास अनंत अडथळे आणले.
त्यामुळे आजही समाजातील जातीयता संपलेली नाही, समतेचा विचार रुजलेला
नाही, अशी खंत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आज लातूर येथील
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक पक्षिकाला 100 वर्ष पूर्ण
झाल्याच्या निमित्ताने लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात चर्चा
सत्र आयोजिले होते, त्यानिमित्त भीमराव आंबेडकर लातुरात आले होते.
मूकनायक च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा जागर सुरू
केला होता. मात्र त्यांच्या नंतर ही चळवळ मंदावली. दोष बाबासाहेबांचा
नाही, फुले-शाहू-आंबेडकरी समाजाने समतेचा विचार स्वीकारला, पण इतरांनी
अनेक अडथळे निर्माण केले. आता ती चळवळ जोमाने सुरू करने काळाची गरज आहे.
असे त्यांनी सांगितले. शिवाय केंद्र सरकारच्या धर्मांतर विरोधी कायद्याला
प्रभावीपणे विरोध करावा लागेल. त्यासाठी 2025 मध्ये काही करोड लोक बौद्ध
धम्मात धर्मातर करणार असल्याची घोषणा देखील भीमराव आंबेडकर यांनी यावेळी
केली.
या पत्रकार परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. बापू गायकवाड,
जिल्हा उपाध्यक्ष विलास आल्टे, बलांडे गुरुजी, अश्विन धसवाडीकर
यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
COMMENTS