------------------------------------------------------
कोकण विभागतील नाविक व त्यांच्या कुटूंबियांना प्रशिक्षण आणि नुसीच्या कल्याणकारी योजनांची महिती देण्यासाठी २१ मार्च ते २६ मार्च २०२२ दरम्यान कोकणात जनजागृती कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण व दापोलीतील नाविकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी चांगले सहकार्य केले. याप्रसंगी नुसीचे उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर यांनी मागदर्शन करतांना नुसी मार्फत नाविक व त्यांच्या कुटुंबासाठी असलेल्या जीवन विमा योजना, कुटुंबासाठी आर्थिक मदत, कोरोना काळातील मदत, झाडे लावा - झाडे जगवा अशा विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनजागृती कार्यायक्रमात दिली. याप्रसंगी महिला समन्वयक अभिलाषा सोनवणे, नुसीचे कार्यालयीन सचिव सलीम झगडे, युवा कार्यकर्ते अनिलकुमार के. व्ही. आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS