भारत सरकारच्या राजपत्रित अधिसूचनेनुसार केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने ३ नोव्हेंबर २०२१ पासून " मेजर पोर्ट ऑथोरिटीज ॲक्ट २०२१" या कायद्याची सर्व प्रमुख बंदरांमध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र या कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने युनियन व फेडरेशन बरोबर कोणतीही बोलणी न करिता व नियम न बनविता कायद्याची कार्यवाही सुरु केली, त्यामुळे बंदर व गोदी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे . मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन यांनी केलेल्या संयुक्त आव्हानानुसार आज गोदी कामगारांनी कामाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा व पोर्ट प्रशासनाचा जाहीर निषेध केला. फेडरेशनने व संलग्न युनियनने बंदरांमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या वैधानिक व्यवस्थेतून " मेजर पोर्ट ऑथोरिटीज ॲक्ट २०२१ " यामध्ये सुलभरीत्या परीवर्तित करण्यासाठी अगोदर पुरेसे सुयोग्य नियम बनवावे लागतील.अशी विनंती केली होती. परंतु बंदरे, नौका नयन व जलमार्ग माननीय मंत्री महोदयांना विनंती केली आहे की, या कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख बदलावी व या महत्वाच्या प्रश्नावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी भेटण्याची वेळ द्यावी.
या कायद्याबाबत युनियन व फेडरेशन बरोबर बोलणी केल्यानंतरच या कायद्याची अंमलबजावणी करावी, असे पत्र मान्यातप्राप्त अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाच्या(कामगार) वतीने सुधाकर अपराज, केरशी पारेख यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री मा. श्री . सर्बानंद सोनोवाल यांना पाठविले आहे.
आज मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये हमालेज बिल्डिंग, पोर्ट भवन, श्रमिक भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल, कंट्रोल ऑफ स्टोअर्स इत्यादी विविध ठिकाणी गोदी कामगारांनी काळ्या फिती लावून घोषणा देत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी दत्ता खेसे, विजय रणदिवे, निसार युनस, मनिष पाटील, कार्यकर्ते गणेश पोळ, अशोक डफळ, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरशी पारेख, सेक्रेटरी राजाराम शिंदे, निवृत्ती धुमाळ इत्यादी मान्यवरांनी कामगारांना मार्गदर्शन केले. आज कर्नाक बंदर येथे केंद्र सरकारच्या या कामगार विरोधी मेजर पोर्ट ऑथोरिटीज कायद्याची होळी करण्यात आली, असे युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांनी सांगितले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
COMMENTS