मुंबई दि.२५ : महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने मुंबईतील असंघटित कामगारांची नोंदणी करण्याची योजना आज पासून सुरू करण्यात आली...
मुंबई दि.२५ : महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने मुंबईतील असंघटित कामगारांची नोंदणी करण्याची योजना आज पासून सुरू करण्यात आली. सरचिटणीस गोविंदराव मोहिते,असंघटित कामगार विभागाचे प्रमुख- उपाध्यक्ष सुनिल बोरकर आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.काही असंघटित कामगार प्रतिनिधीही या प्रसंगी उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत नाका कामगार, ओला, टँक्सी, रिक्षा, बांधकाम विभाग आदी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद करण्यात येऊन, त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे.वरील कामगारांना राज्यसरकारद्वारे सामाजिक सुरक्षितता किंवा अन्य सोयी-सुविधा संदर्भातील फायदे जेव्हा लागू होतील तव्हा ते त्यांना मिळवून देण्यात येणार आहेत.त्या साठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील,अशी माहिती सुनिल बोरकर यांनी दिली.◆◆◆
COMMENTS