अधिवेशन यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचलून जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने स्विकारावी ------ एस. एम. देशमुख

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे होऊ घातलेल्या ४४ व्या राष्ट्रिय अधिवेशनाच्या नियोजनाची बैठक संपन्न  नांदेड / प्रतिनिधी   ( रामप्रसादचन्नावार )...

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे होऊ घातलेल्या ४४ व्या राष्ट्रिय अधिवेशनाच्या नियोजनाची बैठक संपन्न 

नांदेड / प्रतिनिधी 

 ( रामप्रसादचन्नावार )

  पत्रकारांना असलेले अधिकर, बंधने, संधी, समस्या, अडचणी यांचा उहापोह अधिवेशनात होत असतो. अधिवेशनातून संघटनेची ताकद सरकार व प्रशासनाला कळते व दबाव निर्माण होतो. त्यासाठी अशी अधिवेशने गरजेची आहेत. त्यामुळे अधिवेशन यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचलून जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने स्विकारावी, असे आव्हाण परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस. एम. देशमुख यांनी केले. 

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनला येथे अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे होऊ घातलेल्या ४४ व्या राष्ट्रिय अधिवेशनाच्या नियोजनाची बैठक जांबुळकर गार्डनमध्ये पारपडली. बैठकीला मुख्य विश्वस्थ एस.एम. देशमुख यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बाप्पुसाहेब गोरे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर, जिल्हा समनवयक सुनिल जगताप, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, पुणे जिल्हा सचिव सतीश सांगळे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, सोशल मिडिया प्रमुख जनार्दन दांडगे, हवेली प्रमुख बाप्पुसाहेब काळभोर, पत्रकार हल्ला विरोधी जिल्हा प्रमुख के. डी. गव्हाणे, हवेली तालुका सोशल मिडिया प्रमुख गणेश सातव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस. एम. देशमुख यांनी ऑनलाइन पद्धतीन मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, अधिवेशनाला दोन महिणे राहिले आहे. त्यामुळे २४ तास अधिवेशनचा विचार माझ्या डोक्यात आहे. अधिवेशन भव्यदिव्य होणार यात शंका नाही. नियोजनासाठी दर आठ दिवसाल बैठक घेऊ. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक आकर्शक व वाचणीय स्मरणीका आपण काढत आहोत. या स्मरिकेसाठी सर्वांनी योगदान करावे, पत्रकारांनी जास्तीत जास्त जाहाराती मिळवाव्यात, स्मरिकेतील जाहिरासाठी आकर्शक कमिशन आहे. कुटुंब ऑपच्या माध्यमातून परिषदेची व्याप्ती वाढतेय. कुटुंब ऑप सर्वांसाठी आहे. इतर संघटनांच्या पत्रकारांनी हे ऑप स्विकारल्या सुरवात केली आहे. त्यामुळे आपल्या संघटनेचा मुळ उद्देश समोर येत आहे. आपण पारदर्शक आहोत काही लपवन्याची गरजच नाही. जास्तीत जास्त पत्रकारांनी सदस्य झाले पाहिजे. ऑपवरचे सर्व लोक परिषदेचे सदस्य आहेत असे कोणी समजू नये. परिषदेची हि मुव्हमें थांबणार नाही आहे. 

परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी आपल्या मार्गदर्शात राष्ट्रीय अधिवेशनाची गरज का असते हे सांगत, अधिवेशनाच्या मध्यमातून राज्यभरातील पत्रकारांची ओळख होते. त्यांच्या भागातील समस्या व उपलब्धी लक्षात येताता. दर्जेदार लिखाणातून स्मरणीका काढण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जाहिराती स्विकारल्या जातील. त्यासाठी आकर्श दर असुन भरघोस कमिशन मिळेल. स्मरणीकेच्या माध्यमातून पत्रकारांना थोडा उत्पन्नाचे साधन होईल असे सांगितले. 

विभागीय सचिव बाप्पुसाहेब गोरे यांनी खडे बोल सुनवत मुख्याध्यापक या नात्याने ते त्यांचे कर्तव्य करत प्रत्येक तालुका संघाने आर्थिक भार उचलण्याचे आव्हाण केले. जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांनी बैठकीचे उत्तम नियोजन करत सर्व तालुकाप्रमुख व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वगत केले. 

पुणे जिल्हा समन्वयक सुनिल जगताप यांनी प्रास्तावीकात अधिवेशनाचे काय नियोन करायचे, काय अपेक्षित आहे याचा उहापोह केल. अधिवेशन काळात वापरायचा लोगो, लेटरपँड, शिक्के, बँक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे. भोजन व्यवस्थेचे कोटेशन येत आहेत. मंडप नियोजन सुरु आहे. वाजवीदरात जे आपल्याल सेवा देतील त्यांच्यकडून काम करुन घेतले जाईल. किती पत्रकार येणार आहेत. त्यांना निवास, भोजन यासाठी गुगल नोंदनी करण्याची सोय करण्याचे नियोजन होत आहे. शाळेच्या ९० खोल्या आहेत, पण १ हजार ते १,२०० लोक एकाच ठिकाणी कशी सोय होईल यासाठी एका बिल्डर कडून एकाच इमारतीत सोय होईल हे पाहत आहोत. प्रत्येक तालुक्याने या अधिवेशनात सहभागी व्हावे. प्रत्येक तालुका अध्यक्षांना विचारात घेऊन नियोजन सुरु आहे. असे मत समनवयक सुनिल जगताप यांनी मांडले. 

बैठकीला हवेली प्रमुख बाप्पुसाहेब काळभोर, परंदरचे अध्यक्ष राहुल शिंदे, शिरुरचे अध्यक्ष संजय बारहाते, खेडचे अध्यक्ष हणुमंतराव देवकर, दौंडचे रविंद्र खोरकर, जु्न्नरचे अध्यक्ष अतुल  कांकरीया, बारामतीचे सोशल मिडिया प्रमुख महेश जगताप, भोरचे अध्यक्ष वैभव भुतकर, पुणे शहर अध्यक्ष बाबा तारे, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अनिल वडघूले, सुनील वाळुंज,

[10/19, 7:21 AM] Naigao Press Channawar: नायगांव येथे २० ऑक्टोबर रोजी सरकारच्या विरोधात आंदोलन..

नायगांव / प्रतिनिधी 

( रामप्रसाद चन्नावार )

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन संपूर्ण राज्यात दि.२० ऑक्टोबर बुधवार रोजी होणार आहे.

नायगांव येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय समोर हे आंदोलन ,अतिवृष्टी बाधित शेतकऱ्याला तुटपुंजी मदत केलेल्या जीआर ची आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे विरोधात घेतलेल्या निर्णयाची होळी करून सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे .या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपला दबावगट तयार करावा असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी कोलंबी येथे उपस्थित शेतकरी संवाद मेळाव्यात म्हटले आहे.

पांडुरंग शिंदे म्हणाले की, २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त भागाला सरकारने ज्या पद्धतीने मदत केली त्या पद्धतीने मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करावी, जिल्ह्यात पिक विमा शंभर टक्के लागू करावा ,नद्या-नाल्यांना खरडून गेलेल्या जमिनीला विशेष मदत दयावी अशा अनेक मागण्या आम्ही आत्तापर्यंत सरकार दरबारी मांडल्या पण महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. याविरोधात एल्गार शेतकर्‍यांच्या वतीने पुकारलेला आहे ,दुसरीकडे केंद्र सरकारने खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे विरोधात निर्णय घेतल्यामुळे बाजारातल्या सोयाबीनचे दर कमी झालेले आहे अशा दोन्ही सरकारची विरोधात शेतकरी पुत्राच्या वतीने हे आंदोलन होणार आहे .आपल्या बापाच्या हक्काच्या लढाईसाठी जात, धर्म, पक्ष, बाजूला ठेवून आपण या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ही विनंती करून आवाहन केले.

कोलंबी, दरेगाव, गोदमगाव, अंचोली, नरंगल, बेंद्री, लालवंडी या गावात भेट देऊन जनजागृती रयत क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली. आंदोलन जनजागृती साठी शेतकऱ्याचा प्रत्येक गावात उस्फूर्त प्रतिसाद होता.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष शहाजी कदम, युवा तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे, शरद शिंदे शिवाजी गायकवाड ओम प्रकाश शिंदे गणेश शिंदे आणि कोलंबी गावातील दादाराव पा. शिंदे,बाबाराव शिंदे,प्रल्हाद पा. बैस,प्रवीण बैस,विजय बैस,शेतकरी, युवा मित्र

 इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group