भारतातील प्रमुख बंदरातील सेवेतील व सेवानिवृत्त कामगारांना १ जानेवारी २०१७ पासून लागू झालेल्या व ३० ऑगस्ट २०१८ रोजी सह्या झालेल्या वेतन करारानुसार थकबाकी मिळाली आहे, मात्र मुंबई बंदर हे प्रीमिअर पोर्ट असताना देखील या बंदरातील सेवेतील सहा हजार कामगारांना व पस्तीस हजार पेन्शनर्सना अद्याप वाढीव वेतनाची थकबाकी न मिळाल्यामुळे कामगार व पेन्शनर्समध्ये प्रचंड असंतोष आहे, याबाबतीत ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार विश्वस्त सुधाकर अपराज व केरशी पारेख यांनी थकबाकी मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सी. मेंडोसा, उपाध्यक्ष जे. आर. पाटील, जनरल सेक्रेटरी डी.एच. डिंगरेजा व संयुक्त सचिव बी. बी. चिपळूणकर यांनी ८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन श्री. राजीव जलोटाजी यांची भेट घेऊन पेंशनर्सना थकबाकी देण्याची पुन्हा मागणी केली, तेंव्हा दिवाळीपूर्वी थकबाकी देण्याचे प्रयत्न करू असे चेअरमननी आश्वासन दिले. त्याचबरोबर पेन्शन फंड अबाधित ठेवण्याचे चेअरमननी मान्य केले.
या भेटीदरम्यान मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पेन्शन अदालत आणि कौटुंबिक वेतनात सुटसुटीतपणा यावा याबाबत चर्चा केली.तेंव्हा मुख्य लेखाधिकारी श्रीमती मुळे यांनी त्यास संमती दर्शविली. गोदी कामगारांच्या या हक्काच्या मागणीबाबत गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा चालू आहे.अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव यांनी दिली.
आपला
मारुती विश्वासराव
COMMENTS