नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
मतदान करा बाबा आई
मजबूत करू लोकशाही....अशी भावनिक साद घालुन
श्री शिवशंकर विद्यालय वन्नाळी येथे रांगोळी स्पर्धा ऊत्साहात संपन्न झाली.
देगलूर / बिलोली. विधानसभा पोटनिवडणूक 2021च्या अनुषंगाने मतदारात जनजागृती व्हावी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी बिलोली देगलूर विधानसभा, निवडणुक कार्यालय आयोजित शालेय विद्यार्थीसाठीच्या रांगोळी स्पर्धेत आमच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कल्पकतेनी स्पर्धेत हिरीरीने भाग घेत कलात्मकतेनी दाद दिली...
या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक श्री वनंजे सर,वाघमारे सर,बावने सर,कदम सर,मोरे पाटील सर,दिमल दिमलवाड सर,मी पेटेकर सर, स्वामी सर,देशमुख मॅडम,बारडवार सर,दिलीप पाटील सर,अंकमवार मामा अदीसह विशेष सहकार्य केले.विद्यार्थ्यांही ऊत्साहाने सहभागी झालें होते...या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुख्याध्यापक वनंजे सर,देशमुख मॅडम,दिमलवाड सर,वाघमारे सर हे होते...सदरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कलाध्यापक श्री पेटेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
COMMENTS