नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार)
पदवी म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची पुर्ती करणारा कार्यक्रम होय. केवळ पदवीचे शिक्षण महत्वाचे नाही तर त्याबरोबरच नितिमत्ता व मुल्ये आत्मसात करावी.एखादा विद्यार्थी उच्य शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून आयएएस होऊन जिल्हाधिकारी बनू शकतो पण अल्पावधितच श्रीमंत होण्याच्या लोभाने जर तो भ्रष्टाचार केला आणि तुरुंगात गेला तर त्याने ज्या अतिकष्टाने उच्च पद मिळविले खरे पण त्यांनी नितिमता व मुल्ये आत्मसात केली नाही म्हणून त्याचे जीवन दुःखमय व अंधकार बनले. याउलट कोणतीच पदवी न घेतलेल्या अडाणी असलेल्या संत जनाबाई, बहिणाबाई चौधरी यासारख्या असंख्य संतांनी आपल्या आयुष्यात नितिमतेने वागले आणि जीवनातील मुल्ये आत्मसात केले त्यामुळे ते समाजासाठी आदर्श बनले त्यांच्या साहित्यावर असंख्य विद्यापीठामध्ये शेकडो संशोधकांनी पीएचडी केली आहे. म्हणून पदवी धारण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये नितिमता आणि मुल्याची जोपासना करावी असे प्रतिपादन प्रा.डॉ. नारायणराव बोराडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व शरदचंद्र महाविद्यालय नायगांव बा यांच्या संयुक्त विद्यमाने कै. बळवंतरावजी चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केलेल्या द्वितीय पदवी दिक्षांत समारंभामध्ये केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. बाळासाहेब ढेंबरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एज्यूकेशन सोसायटी नायगावचे अध्यक्ष आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार वसंतराव पा. चव्हाण हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मान्यवराच्या पुढे लेझीम पथकासह विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजसंचलन करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलन करून सरस्वती पुजन झाल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ आणि एज्यूकेशन सोसायटी नायगावचे संस्थापक कै. बळवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. संगीत शिक्षिका सौ. उप्पलवार मॅडम, बैस सर, माने सर व विद्यार्थांच्या संचाने विद्यापीठ गीत गायिले गेले. त्यानंतर विचारपीठावरील मान्यवरांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या दिक्षांत समारंभामध्ये तिन्ही शाखातील एकूण 48 विद्यार्थाना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.पदवी प्रमाणपत्र वाटपासाठी डॉ. सौ. वाडेकर यांनी सहकार्य केले. यावेळी वसंतराव पा. चव्हाण यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य प्रो. डॉ.बालासाहेब ढेंबरे यांनी महाविद्यालयाच्या गुणात्मक व संख्यात्मक वाढीचा आलेख प्रस्तूत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पदवी वितरण समितीचे सदस्य सचिव डॉ सानप एन.पी. यांनी प्रास्ताविक मांडले. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक केशवरावजी पा. चव्हाण, माधव अप्पा बेळगे ( संचालक) सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका वर्ग, कार्यालयीन अधिक्षक प्रशांत बिलवणीकर आणि कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन प्रा.डॉ. शंकर गड्डमवार यांनी केले तर आभार प्रो. डॉ. बलभीम वाघमारे यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS