महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभे केले पाहिजे – सौ. संध्याताई कल्याणकर

कार्ड संस्था व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमानाने व्यवसाय मार्गदर्शन शिबिर -------------------------------------------------------------...


कार्ड संस्था व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमानाने व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

----------------------------------------------------------------

नांदेड-बचत गट हा एक सामाजिक, आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असते. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभे केले पाहिजे, असे मत नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी सौ. संध्याताई कल्याणकर यांनी कार्ड संस्था व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमानाने रहाटी येथे घेतलेल्या रोजगार व्यवसाय मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्ड संस्थेचे मॅनेजर दत्ता पवार, नाबार्डचे दुरवे, आत्माचे चंद्रशेखर कदम, सोनटक्के, ऋषिकेश कोंडेकर, सुरत,पंकज, दीपक, समाधान अवतारीक, इंदुरकर, एसबीआयच्या मंजुषा कदम यांच्यासह महिलां मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

                    नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी सौ. संध्याताई कल्याणकर यांनी नांदेड उत्तर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात महिला बचत गट स्थापन केले आहेत. महिलांना संघटित करून त्यांना कमीत कमी किमतीमध्ये विविध मशनरी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या बरोबरच विविध संस्थांकडून कमीत- कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत. दि. 11 रोजी राहटी येथे कार्ड संस्था व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी स्वयंरोजगार व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. संध्याताई कल्याणकर होत्या. त्यांनी बोलताना महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभे केले पाहिजे. त्यातून आपल्या कुटुंबालाच नव्हे तर सामाजिक कार्याला देखील हातभार लागतो. प्रत्येक महिला ही सक्षम बनली पाहिजे, त्यासाठी वेळोवेळी मी मदत करण्यास तयार आहे. कार्ड संस्था व एचडीएफसी बँक देखील आपल्या महिलांना मार्गदर्शन शिबीर तसेच आर्थिक मदत देखील करण्यास तयार आहेत. कार्ड संस्थेने यापुर्वी देखील महिलांना शेळी पालन, कुकुट पालन, कापड दुकान यासह आदी व्यवसायासाठी अनुदान दिले आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात अशाप्रकारे वेगवेगळे कार्यक्रम ठेवून, आम्हा महिलांना मार्गदर्शन केले पाहिजे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहटी येथील गब्बु पाटील बोकारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी सत्यभामा पांचाल , विद्या कस्बे, अन्नपुरे, सरपंच डॉ. लांडगे, माजी सरपंच पंढरीनाथराव बोकारे, तंटामुक्त अध्यक्ष शंकर पाटील, गणेश बोकारे, हरीभाऊ बोकरे, संजय बोकारे, किशन बोकारे, काशीनाथ बोकारे, गोपाल बोकारे, राजेश निवडंगे, आकाश बोकारे, मुन्ना बोकारे, उद्धव बोकारे यांच्यासह आदीजण उपस्थित ‍ होते.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel