मुंबई दि.२: राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे माजी संघटन सेक्रेटरी व खटाव मिलचे धडाडीचे कार्यकर्ते संजय चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले( ५५ )...
मुंबई दि.२: राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे माजी संघटन सेक्रेटरी व खटाव मिलचे धडाडीचे कार्यकर्ते संजय चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले( ५५ ). त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी असा कुटुंब परिवार आहे.संघटनेचे विविध लढे आणि अनेक सांस्कृतिक चळवळीत सहभागी होणाऱ्या संजय चव्हाण यांनी आपल्या कामातून कामगारांमध्ये ओळख निर्माण केली.सदा हसतमुख आणि खेळीमेळीच्या स्वभावातून त्यांनी खटाव मिल कामगारांमध्ये आपल्या लोभस आठवणी कायम ठेवल्या.त्यांच्या दुःखद निधनाबद्दल अध्मक्ष सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते,तसेच पदाधिकाऱ्यांनी 'तळमळीचा कर्यकर्ता' हरपला,असे शोक व्यक्त करतांना म्हटले आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने खटाव मिल कामगारांमध्ये शोककळा उमटून आलेली दिसते.●●●

COMMENTS