नायगांव / प्रतिनिधी
(रामप्रसाद चन्नावार)
स्टेट बँक शाखा नायगांव येथील सर्व थकबाकीदारासाठी व्याजा मध्ये शंभर टक्के पर्यंतची शूट देण्याची मुभा सदर बँकेने राबवित असून दिनांक एक ऑगस्ट रोजी नायगांव न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालत भरली जाणार असल्याने यात थकीत कर्जदार यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शाखाधिकारी दीलीप पवार यांनी केले आहे.
एनपीए च्या थकीत असलेल्या कित्येक कर्जदारांनी आपल्या व्याजासाठी बेचैन होते मात्र एसबीआयने यांना दिलासा देत राष्ट्रीय लोक अदालत बनविण्याचे ठरविले असून यात दिनांक एक ऑगस्ट रोजी थकबाकीदारांना एकरकमी परतफेड योजनाचा लाभ घेण्यासाठी आपली थकबाकी तडजोडीत करावी आणि जे थकबाकीदार 31 जुलैपर्यंत तडजोड करू इच्छितात त्यांनी आपल्या थकबाकीची 25% रक्कम बचत खात्यात भरून शाखा अधिकारी यांना भेटावे अशीही कळवीत एक ऑगस्टच्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सर्व एनपीए च्या थकीत कर्जदारांना या एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन एस बी आय चे शाखाधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.

COMMENTS