नांदेड प्रतिनिधी नांदेड़ जिल्हातील बरैच कामगार आणी प्राईवेट नोकरी करणारे कर्मचारी यांना लॉकडाऊनमुळे नोकरी वरुन काढुन टाकण्यात आले आहे. आशा कुंटूबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर प्राईवेट नोकरी करणारे कर्मचारी व कामगारांना काढु नका अन्यथा थाळी बजाव आंदोलन करण्यात येईल अशी कडकडीत इशारा व्यापारी, उद्योजक, कारखाने यांच्या मालकास मराठवाडा विद्यार्थी संघटने चे नांदेड जिल्हा अध्यक्ष पी जी कोटुवार यांनी केले.
गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कानावर फक्त एकच शब्द वारंवार पडतोय आणि तो म्हणजे ’लॉकडाऊन’. कोरोनापेक्षा लॉकडाऊनची भीती आता लोकांना सर्वात जास्त वाटत आहे. लॉकडाऊनमुळे कंपन्या आणि व्यवसाय सर्व काही बंद आहे. याचा त्रास नोकरी करणा-या लोकांना झालाय. मात्र लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका नोकरी शोधणा-या लोकांना झालाय. लॉकडाउनच्या या कठीण काळात नोकरी कशी मिळणार ? अजून किती दिवस हे चालणार ? लॉकडाऊन नंतर नोकरीच्या संधी उपलब्ध होतील का ? असे अनेक प्रश्न सध्या नोकरी शोधणा-या लोकांच्या मनात आहेत. त्यात भर म्हणून राज्य सरकारनं पुढच्या एक वर्षात सरकारी भरती होणार नाही असं जाहीर केलं आहे. त्यामुळे नोकरी शोधणारे लोकं अजूनच हतबल झाले आहेत. मात्र आता घाबरून जाऊ नका.
नक्कीच मराठवाडा विद्यार्थी संघटना या लॉकडाउनच्या कठीण काळात प्राईवेट नोकरी व कामगार व सुशिक्षत बेरोजगार यांच्या सोबत आहे. हा लॉकडाऊनचा काळ जसा तुमच्यासाठी कठीण आहे तसाच कंपन्यांसाठीही आहे. मराठवाडा विद्यार्थी संघटने मार्फत तुमची प्रोफाइल पाहून तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आपले प्रोफाईल लवकरात लवकर नांदेड जिल्हा मराठवाडा विद्यार्थी संघटनेच्या कार्यालया कडे जमा करावी असे विनंती नांदेड जिल्हा अध्यक्ष पी जी कोटुरवार यांनी केले आहे.
लॉकडाऊनमध्ये कंपन्याही आर्थिक समस्यांमधून जात आहे त्यामुळे नवीन लोकं घेण्याबाबत त्यांच्या मनात संभ्रम असू शकतो. मात्राब तुम्ही तुमचा संयम सोडू नका. संघटनेच्या च्या सतत संपर्कात राहा. तुमच्या प्रोफाइल आणि नोकरीबद्दल त्यांच्याकडून माहिती घेत राहा. या लॉकडाउनच्या काळात संयम ठेवला तरच नोकरी प्राप्त होऊ शकेल.

COMMENTS