*केज रमेश इतापे*
केज तालुक्यातील व परीसरातील शेतकरी बांधवाना खरीप हंगामासाठी बँकानी तातडीने पीककर्ज उपलब्ध करून शेतक-यांची आर्थीक चणचण व शेतक-याना पिक कर्जाच्या माध्यमातून आर्थीक आधार देण्याची मागणी केज तालूक्याचे येथील थोर सामाजिक नेते,व बहूजन रयत परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मा. श्री.रमेश तात्या गालफाडे यांनी केली आहे.
मागीलवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाउस व सततच्या अतीवृष्टीने सोयाबीन, कापुस, तुर,मुग,उडीद ईत्यादी पिकांचे आतोनात नुकसान झाले यानंतर कोरोणा महामारीने शेतक-याचा रबीहंगामात लॉकडाउनने शेतमालास, फळपीकांना,भाजीपाला पिकांना फटका बसला, केज तालूक्यासह बराच परिसर हा बागायती परीसर आसुन या भागात युसुफ वडगाव, धनेगाव, अनेगाव, गावसुर्डी, सोनेसंगावी या भागात उस, कापूस, केळी, मोसंबी, अशी पिके घेतली जातात पण हातातोंडाशी आलेले पिकाचे लॉकडाउनने मोठे नुकसान झाले, भाव नाही यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे आशा संकटसमयी खरीपाचे बि , बियाणे , खत , औषधी खरेदी , व शेतीकाम करता शेतकरी कागदपत्रे पुर्तता करून पिककर्ज मागणी करत आहेत ,परंतु कोरोणामुळे बँका बंद आसल्याने वेळेवर पीककर्ज देण्यात अडचन येत आहे , त्यामुळे शेतक-यांना बँकात चकरा माराव्या लागल्या
शेतक-यांची आर्थिक अडचन लक्षात घेता बँकानी शेतक-यांना मागणीनुसार वाढीव स्वरूपाच पीककर्ज तातडीने देण्याची मागणी थोर सामाजिक नेते व बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मा. श्री.रमेश तात्या गालफाडे यांनी केली आहे.

COMMENTS