नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत 'कल्याण' मटका-जुगार जोमात

नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुदबेनगर परिसरातील 'मुखिद' फंक्शन हॉलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर व ...


नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुदबेनगर परिसरातील 'मुखिद' फंक्शन हॉलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर व वाजेगावातील 'सहारा' ज्यूस सेंटरशेजारी मोकळ्या जागेत कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असलेल्या दोन आरोपींना मुद्देमालासह १० जून रोजी पोलिसांनी जेरबंद केले. वाजेगाव तसेच नांदेडच्या 'खुदबे'नगर परिसरात 'कल्याण' नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असलेल्या दोन आरोपींकडून पोलिसांनी नगदी ६ हजार ८८० रूपये जप्त केले असल्याचीही अधिकृत नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात असल्याने या ठाण्याच्या हद्दीत 'कल्याण' जोमात सुरू असल्याचे निदर्शनास येते.  

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड 'ग्रामीण' ठाण्यांतर्गत असलेल्या 'खुदबे'नगर परिसरातील 'मुखिद' फंक्शन हॉलसमोरील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे 'कल्याण' नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती एका गुप्त बातमीदाराने डी. बी. अर्थात गुन्हे शोध पथकाला दिली. ही माहिती समजताच गुन्हे शोध पथकातील नाईक पो. कॉ. अनुक्रमे- प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, अतुल सातारे व पो. कॉ. विश्वनाथ पवार आदींनी प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली उपरोक्त ठिकाणी १० जून रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेदरम्यान, धाड टाकली. या धाडीदरम्यान, घटनास्थळी आरोपींनी लोकांकडून पैसे घेवून 'कल्याण' नावाचा मटका खेळत व खेळवित असताना आढळून आला. त्याचवेळी,पोलिसांनी घटनास्थळावरून रोख चार हजार १८० रूपये आणि जुगाराच्या साहित्यासह आरोपीलाही जेरबंद केले आहे.

दुसरीकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक पी. डी. कांबळे तसेच त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी 'स्थागुशा'चे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाजेगाव येथील सहारा ज्यूस सेंटरशेजारील मोकळ्या जागेतील जुगार अड्डयावर  धाड टाकली. या धाडीदरम्यान, उपरोल्लेखित ठिकाणी आरोपी लोकांकडून पैसे घेवून चिठ्ठयावर आकडे देत 'कल्याण' नावाचा मटका खेळत व खेळवित असताना पोलिसांना आढळून आला. त्याचवेळी, 'स्थागुशा'च्या विशेष शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी उपरोल्लेखित जुगार अड्डयावरून रोख २ हजार ६८० रूपये व जुगाराच्या साहित्यासह वाजेगाव येथील आरोपीस जेरबंद केले. 

याप्रकरणी अनुक्रमे-नांदेड ग्रामीण ठाण्यातील पोलीस नाईक पी. जी. कऱ्हाळे व 'स्थागुशा'चे पोलीस नाईक पी. डी. कांबळे यांच्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याशिवाय, ११ जून रोजी ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील वाजेगाव येथील जुगार अड्डयावर गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक संतोष जाधव, प्रमोद कऱ्हाळे आणि विश्वनाथ पवार यांनी धाड टाकली. या धाडीदरम्यान, पोलिसांनी रोख १ हजार ५८० रूपये आणि मटका जुगाराच्या साहित्यासह आरोपीला ताब्यात घेतले, अशी माहिती ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते व मदतनीस महिला पो. कॉ. पूनम उदगिरे यांनी दिली आहे. 

याप्रकरणी पोलीस नाईक एस.आर. जाधव यांच्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात  आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्र. पो.नि. घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालाजी चंचलवाड हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. 

एकूणच, नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त करीत केवळ कांहीजणांचे कल्याण करणारा 'कल्याण'कारी मटका-जुगार गेल्या काही महिन्यांपासून जोमात सुरू असल्याचे सिद्ध होत आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel