नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
रयतेचा हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार!सतराव्या शतकात महाराष्ट्रात भूमिपुत्रांचे हिंदवी स्वराज्य राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीयां जुलमी सत्ताधिशांशी- वतनदारांशी अनेक लढाया ,युध्दे लढून या महाराष्ट्रभूमीत स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत .राष्ट्र निर्माता असलेल्या या महापुरुषाच्या
लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 हा शिवराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याचा, सार्वभौमत्वाचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा दिवस आहे .तो आज शिवस्वराज्य दिन म्हणून ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव येथे गुढी उभारून साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच किरण रामराव कदम, उपसरपंच रशिद शेख,मुख्याध्यापक वीरभद्र मिरेवाड आणि मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शिव स्वराज्याच्या गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली. यावेळी राष्ट्रगीत आणि गर्जा महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले. याप्रसंगी गावातील नामदेव पाटील माने ,सोपान देगावकर, बळवंत होते,साईनाथ होटकर, आकाश पांचाळ, सुधाकर होटकर,व्यंकट कदम, विठ्ठल माने, शादुल सय्यद, काशिनाथ सोनटक्के, लतिफ शेख, सुरेश कदम, अशोक वाघमारे, रोहीत होटकर, वसंत माने, हणमंत माने, सौ.लत्ता कदम, सौ.मिना कदम, सौ.गोदावरी होटकर
आदी उपस्थित होते

COMMENTS