दि.६ नांदेड जिल्हा परिषद हायस्कूल वाघी व वृक्षमित्र परिवार नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथे वृक्षप्रेमी नाग...
दि.६ नांदेड जिल्हा परिषद हायस्कूल वाघी व वृक्षमित्र परिवार नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथे वृक्षप्रेमी नागरिकांना स्काऊट गाईड विभागाच्यावतीने वृक्ष भेट देण्यात आलेले आहेत तसेच येथे स्काऊट गाईड च्या मुला-मुलींनी सदरील वृक्ष हे गावात, घरी लावून त्याचं संवर्धन देखील करणार आहेत यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख माधवराव जाधव, मुख्याध्यापक सुरेश ओंकार बादशहा, क्रीडा शिक्षक प्रलोभ कुलकर्णी यांच्या सह स्काऊट गाईड चे मुले मुली, वृक्ष प्रेमी नागरीक यावेळी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती वाघमारे श्रीमती सुषमा पुष्पा स्काऊट गाईडचे मुला मुली यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमा साठी वृक्षमित्र परिवार यांनी सहकार्य केले.

COMMENTS