स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांमध्ये आज दिनांक 5 जून रोजी 75 रोपांची लागवड करण्यात आली. 'आजादी के 75 साल' आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ परिसरामध्ये रोपांची लागवड करण्यात आली.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्रशासनाने 'आजादी की 75 साल' साजरा करण्याचे नियोजन केले आहे. आणि आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन ही आहे. या दोन्ही कार्यक्रमाचे निमित्त साधून विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ सर्जेराव शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ शिवराज बोकडे, प्रा डॉ रमजान मुलानी, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, सहाय्यक कुलसचिव रामदास पेद्देवाड, प्रीतम भराडीया, गोविंद हंबर्डे व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी 75 रोपांची लागवड करून 'आजादी के 75 साल' आणि जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.

COMMENTS