घरात गळफास घेवून तरूणाची आत्महत्या

नांदेड.(प्रतिनिधी) राहत्या घरातील पत्र्याखालील अँगलला दोरीने गळफास घेवून एका ३५ वर्षीय तरूणाने आपली 'जीवन'यात्रा संपविली. ही घटना ४ ...



नांदेड.(प्रतिनिधी) राहत्या घरातील पत्र्याखालील अँगलला दोरीने गळफास घेवून एका ३५ वर्षीय तरूणाने आपली 'जीवन'यात्रा संपविली. ही घटना ४ जून रोजी सकाळी नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत असलेल्या साईबाबानगर परिसरात उघडकीस आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत असलेल्या एनडी-११६, साईबाबा नगर, हडको परिसरातील रहिवासी सुनील संग्राम घाटकर हे नेहमीप्रमाणे ३ जून रोजी रात्री त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत झोपले. दरम्यान, ४ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत आपला मुलगा सुनील घाटकर हा का उठला नाही, म्हणून वडील संग्राम घाटकर हे घराच्या दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत जावून डोकावून पाहिले असता, सुनील घाटकर हा त्याच्या खोलीतील पत्र्याखालील अँगलला दोरीने गळफास घेवून मृतावस्थेत लोंबकळत असल्याचे चित्र त्यांच्या निदर्शनास आले आहे.  

उपरोल्लेखित घटनेची माहिती समजताच प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गोविंद खैरे, नाईक पो. कॉ. बालाजी मुसांडे, नाईक पो. कॉ. महिंद्र कवठेकर तसेच त्यांच्या अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळ पंचनामा केला. दरम्यान, पोलीस नाईक बालाजी मुसांडे व पोलीस नाईक महिंद्र कवठेकर यांनी सुनील घाटकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.

विशेष बाब म्हणजे, सुनील घाटकर यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या का बरं केली असावी, याचे नेमके कारण शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकले नसले, तरी पोलीस तपासाअंती त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल, असा अंदाज पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात आला आहे. 

याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group