बालाजी पाटील -
केवळ पाऊस आणि धरणातील पाणी साठ्यावर अवलंबून राहिल्यास पाणीटंचाई चा कधीही सामना करावा लागू शकतो. याच अनुषंगाने परिसरातील राजुरा तांडा ता.मुखेड येथे जमिनीत पाणी मुरविण्यासाठी ठोस पावले उचलत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल २५ शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत.तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आतापासून च जमिनीत पाणी मुरविण्याची सुविधा केली तर पुढील वर्षी पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येऊ नये यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे.तसेच तीन टप्प्यात १०० शोष खड्डे तयार करण्यात येणार असल्याचे उपसरपंच प्रतिनिधी किरण चव्हाण यांनी सांगितले.यावेळी सरपंच प्रतिनीधी परशुराम चव्हाण,माजी सरपंच प्रतिनीधी शिवाजी चव्हाण,पंचायत समिती मुखेड अधिक्षक रामराव चव्हाण साहेब,इंडीयन आर्मी अजित राठोड साहेब,ग्रामपंचायतीचे सेवक प्रकाश राठोड,उपसरपंच प्रतिनीधी किरण भाऊ चव्हाण,वसंत चव्हाण,बालाजी राठोड,सुनील चव्हाण,नंदकुमार चव्हाण,सुनील राठोड आदी उपस्थित होते.या शोषखड्या मुळे गावातील घान पाणी जमिनीत मुरेल व गावातील घाण कमी होईल तसेच गाव स्वच्छ व गावातील नागरिक निरोगी राहतील.असे उपसरपंच प्रतिनिधी किरण यांनी बोलताना सांगितले.

COMMENTS