नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार ) वर्ल्ड व्हिजन इंडिया व आरोग्य विभाग भोकर च्या वतीने ध्वनीक्षपकाद्वारे रिक्षावरून कोरोना संसर्ग टाळन्याच्या जनजागृती अभियानाची प्रशंसा करून उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी आपल्या हस्ते हिरवा झेंडी दाखून दि .११ जुन रोज शुक्रवारी सकाळी १०=३० वाजता शुभारंभ केला .
यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. अशोक मुंडे, डॉ. साईनाथ वाघमारे , आरोग्य पर्यवेक्षक सत्यजीत टिप्रेसवार, वर्ल्ड व्हिजनचे प्रकल्प संचालक श्याम बाबु पट्टापू, सत्येन्द्र कुमार कनासिया, इमा गावीत, प्रकाश फुलझेले, विनोद घोडके,करण मेशन, बाबुराव सोनकांबळे, आदींची उपास्थिती होती .कोरोना संसर्ग टाळन्यासाठी वर्ल्ड व्हिजन इंडिया व आरोग्य विभाग यांच्या वतीने भोकर शहर व तालुक्यातील प्रत्येक गाव , वाडी, तांडा येथे पाच अॅटोरिक्षावरून तीन दिवस ध्वनीक्षेपकाद्वारे कोरोना संसर्गाची काळजी न करता सावध रहा, खोकला ताप व श्वास घेण्यास त्रास होणे लक्षणे दिसताच त्या व्यक्तिशी संपर्क टाळून त्याचा उपचार करा, शिंकतांना, खोकलतांना आपल्या नाका तोंडावर रुमाल धरा, मास व अंडी पूर्णपणे शिजऊंन घ्या, माक्स वापरा कोरोना टाळा . या आशयाची क्लीप वाजऊन गावागावातीत नागरिकांना सतर्क केला जाणार आहे . प्रत्येकांनी कोरोना टाळण्याची व काळजी घेण्याची जनजागृती करण्यात येणार असून प्रकल्प अधिकारी श्याम बाबु यांनी नागरीकांच्या आरोग्यासाठी लाखो रुपयाच्या अनेक वस्तुंचा आरोग्य विभागास पुरवठा केला आहे व यापुढेही पुरवठा करणार असल्याचे सांगितले .

COMMENTS