*या कोव्हीड केअर सेंन्टरला प्रशासनाचे नेहमी सहकार्य राहील. - मा.ना. नवाबजी मलिक*
*जिल्हाधिकारी दीपक मूगळीकर यांची उपस्थिती*
सेलू. (दि 21) येथील श्रीराम प्रतिष्ठानच्य शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटरला परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री, मा.ना. नवाबजी मलिक यांनी सदिच्छा भेट दिली. जगामध्ये या कोव्हीड ने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत डॉ. संजय रोडगे यांनी सामाजिक बांधिलकी व सध्याची गरज लक्षात घेऊन व एक मोठ्या जबाबदारीचे कार्य हाती घेतलेले आहे. यातून खरंच एक सामाजिक बांधिलकी दिसून येते. या शरदचंद्रजी पवार कोव्हीड केअर सेंटरला प्रशासनाचे नेहमी सहकार्य राहील, याचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना होईल असे प्रतिपादन केले.
यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी मा. दीपक मुंगळीकर, उपविभागीय अधिकारी मा. उमाकांत पारधी, नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, तहसीलदार बालाजी शेवाळे, वैद्यकीय अधीक्षक संजय हरबडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रजी पाल, पोलीस निरीक्षक भूमे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, मिलिंद सावंत, अन्वर पठाण व डॉ. आदित्य रोडगे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

COMMENTS