आ. बालाजी कल्याणकर यांनी वैद्यकीय विभागाचा घेतला आढावा

ऑक्सिजन, रेमडीसीवीर व  रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्या बाबत केल्या सूचना -------------------------------------------- नांदेड - कोरोना संसर्...


ऑक्सिजन, रेमडीसीवीर व  रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्या बाबत केल्या सूचना

--------------------------------------------

नांदेड - कोरोना संसर्गजन्य आजारामुळे शहरात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चाललेले आहे. या आजाराने ग्रासलेले रुग्ण चिंतेने भयभीत झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आ. बालाजी कल्याणकर यांनी दि.6 रोजी मंगळवारी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ. बालाजी कल्याणकर यांनी ऑक्सिजन, रेमडीसीवीर व  बेड रुग्णांना तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. तसेच  सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी हे या महामारीत ही आपली जीवाची पर्वा न करता अहोरात्र चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. सर्वांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी याकरिता प्रशासनातर्फे आवश्यक असलेली सर्व मदत करण्याचे आश्वासन आ. कल्याणकर यांनी दिले.  या बैठकीला अधिष्ठाता डॉ. दीलीप म्हैसेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद पाटील बोंढारकर यांच्यासह डॉ. विवेक सहस्त्रबुद्धे, डॉ.  हेमंत गोडबोले, वैद्यकीय उपाधीक्षक डॉ.  प्रदीप बोडके, डॉ.  गणेश मनुरकर, डॉ.  व्यंकटेश खडके, औषध भांडार प्रमुख डॉ.  एन. के. नंदनवनकर, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, पार्वती भोकरे यांच्यासह  आदी कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.                              

                         सध्या शहरात कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सर्व नागरिक भयभीत झाले आहेत.याचे परिणाम ग्रामीण भागात देखील दिसत आहेत. रुग्णांना वेळेतच रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्याबरोबरच ऑक्सिजन, रेमडीसीवीर यासारखी महत्वाची इंजेक्शने देखील उपलब्ध होत नाहीत. शासकीय यंत्रणेकडे देखील बेड नसल्याचे समोर येत आहे. अशा अनेक तक्रारी नांदेड उत्तर चे आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे आल्या. त्यांनी याची शहानिशा करण्यासाठी वैद्यकीय विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीत आ. बालाजी कल्याणकर यांनी सध्या रुग्णालयात असलेल्या  सुविधांची माहिती घेतली.

                          यावेळी रुग्णालयात ऑक्सिजनचे 300 बेड आहेत, 100 व्हेंटिलेटर, पुढील दोन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा, दहा हजार किलो ऑक्सिजनची क्षमता असणारे दोन टॅंक उपलब्ध आहेत. त्याबरोबरच रेमडीसीवीर चा पुरेसा  साठा आहे. तसेच पुढील दहा दिवसात 100 बेड उपलब्ध करत असल्याची माहिती वैद्यकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याबरोबर तीस व्हेंटिलेटर ची मागणीदेखील वैद्यकीय विभागाने केली आहे. ते देखील लवकरच मिळणार असल्याचे संगितले. यावर नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी वैद्यकीय विभागाला बेड वाढविण्याबाबत सूचना केल्या.  येथील रुग्णालयात वैद्यकीय विभागाकडून स्वच्छते बाबत अधिकची काळजी घेतली जात आहे. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांना रुग्णालय व परिसरात स्वच्छता दिसून आली त्यांनी वैद्यकीय विभागाचे यावेळी आभार मानले. 

    कोरोणा रुग्ण असलेल्या वार्डामध्ये रुग्णांच्या सुविधे करिता लाऊड स्पीकर व वॉकी टॉकी ची व्यवस्था, पुढील काळात ऑक्सिजन, रेमडीसीवीर व  बेड ची कमतरता भासणार नाही याची आत्ताच वैद्यकीय विभागाने खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील आ. बालाजी कल्याणकर यांनी केल्या आहेत. त्याबरोबरच प्रत्येक रुग्ण व त्यांच्या नातेवाईका बरोबर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सौजन्याने वागून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबतच्या सूचना सर्व वैद्यकीय टीमला देणे गरजेचे असल्याचे आ.  बालाजी कल्याणकर यांनी संगितले. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अडचणीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री  अशोक चव्हान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देणार असून तात्काळ अडचणी सोडवण्या मी पाठपुरावा करणार असल्याचे आ. बालाजी कल्याणकर यांनी सांगितली. 

*जेम्बो कोविड  सेंटर उभारणीस स्टाफ ची कमतरता 

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरात नवीन जेम्बो कोविड  सेंटर उभारणे गरजेचे आहे. मात्र वैद्यकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची कमतरता असल्याचे वैद्यकीय विभागाने आ. बालाजी कल्याणकर यांना सांगितले. याबाबत नवीन स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी वैद्यकीय मंत्र्यांकडे करणार असल्याचे आ. बालाजी कल्याणकर यांनी सांगितले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel